Home Uncategorized पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी पुनश्च सादर करीत आहे, *पु.ल. कट्टा...

पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी पुनश्च सादर करीत आहे, *पु.ल. कट्टा – कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ*

76
0

महाराष्ट्राच्या बहुआयामी लाडक्या पुलंच्या २५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, दि. १२ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नूतनीकृत अकादमीच्या नवीन खुल्या रंगमंचावर हा उपक्रम पुनश्च सुरू करण्यात येत आहे. पुलंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सुरू होणारा हा उपक्रम दर शुक्रवारी अकादमीच्या खुल्या रंगमंचावर रंगणार आहे. राज्यभरातील सर्व कलाकारांना आपापली कला सादर करण्याची संधी या रंगमंचावर मिळणार आहे.
गायक शार्दूल कवठेकर, गायिका अदिती पवार , हार्मोनिअम वादक प्रणव हरिदास, तबला वादक सौरभ शिर्के, अभिवाचक अक्षय शिंपी, नेहा कुलकर्णी, डाॅ कविता सोनावणे, , नृत्यांगना राधिका जैतपाळ हे तरुण कलाकार आणि ज्येष्ठ कलाकार डॉ. शिरीष ठाकूर हे सर्व आपल्या सादरीकरणातून पुलंना मानवंदना देणार आहेत. सूत्रसंचालन जान्हवी दरेकर करतील. पुलंच्या साहित्यकृतीवर आधारित या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आशिष शेलार,मंत्री, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.
****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here