Home Uncategorized स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळावर जाऊन सुनिल तटकरेंनी केले अभिवादन;गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ च्या...

स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळावर जाऊन सुनिल तटकरेंनी केले अभिवादन;गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ च्या सांगता समारोपाला सुरुवात…*

83
0

*स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळावर जाऊन सुनिल तटकरेंनी केले अभिवादन;गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ च्या सांगता समारोपाला सुरुवात…*

 

सातारा – कराड दि. २२ मे – गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ चा सांगता समारोपाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या समाधीस्थळावर अभिवादन करून आज केली.

गौरवशाली महाराष्ट्राचा ६५ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुंबईमध्ये तीन दिवस विविध कार्यक्रमांनी करण्यात आला होता आणि या महोत्सवाची सांगता कराड आणि महाड येथे दिनांक २३ मे रोजी होणार आहे.

आज सकाळी ९ वाजता प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पहिल्यांदा कराड येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून नंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या समाधीस्थळावर अभिवादन केले. नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या विरंगुळा या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या प्रदर्शनाची पाहणी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, माजी आमदार नाईक, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे,उपाध्यक्ष मनोज देशमुख आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here