Home Uncategorized *पंढरपूर देवस्थानचे जतन,संवर्धन आणि संगोपन करण्यामध्ये उपसभापती डॉ.नीलम ताई गोऱ्हे यांचा सिंहाचा...

*पंढरपूर देवस्थानचे जतन,संवर्धन आणि संगोपन करण्यामध्ये उपसभापती डॉ.नीलम ताई गोऱ्हे यांचा सिंहाचा वाटा : ह.भ.प.श्रीगुरू गहिनीनाथ महाराज औसेकर.*

415
0

पुणे, दि .४ :श्री सद्गुरु संतवर्य योगिराज शंकर महाराज ट्रस्ट च्या वतीने श्री शंकर महाराज यांच्या 78 व्या समाधी सोहोळ्यानिमित्त शिवसेना नेत्या आणि उपसभापती डॉ.नीलम ताई गोऱ्हे यांनी शनिवारी सायंकाळी धनकवडी येथील श्री शंकर महाराज यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी येथे पंढरपूर देवस्थान समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. श्रीगुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे कीर्तन सुरू होते.त्यावेळी नीलम ताई गोऱ्हे यांनी कीर्तन ठिकाणी हजेरी लावली.
यावेळी श्री औसेकर महाराज यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करते वेळी म्हणाले,पंढरपूर देवस्थानच जतन,संवर्धन आणि संगोपन करण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो उपसभापती डॉ.नीलम ताई गोऱ्हे यांचा आहे. पंढरपूर देवस्थानचे काम करते वेळी नीलम ताई गोऱ्हे यांनी अधिकारी वर्गाला मंदिर आराखडा बनवताना सळो की पळो करून सोडले. आमच्यासारख्या नियुक्त केलेल्या माणसाला देखील त्या बसू देत नव्हत्या यामुळेच आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर परिसराचे संवर्धन होत आहे.
आम्ही त्यांच्याकडे कामानिमित्त जाताना प्रत्येक कागदपत्र दहा वेळा पाहून जायचो,आमच्याकडून त्या बारिक बारिक गोष्टींची माहिती घ्यायच्या,असे सांगत ते पुढे म्हणाले, आपले पंढरपूर वर प्रेम नाही.तर तुमचा पंढरपूरवर जीव आहे. जीव कधीच तुटत नाही,असे सांगत ते पुढे म्हणाले,मला आयोजकांमार्फत सांगण्यात आलं की,आज नीलम ताई गोऱ्हे या आपले कीर्तन ऐकण्यास वर येणार आहेत. एक गोष्ट सांगावी वाटते ती म्हणजे राजकारणात राहून सुद्धा ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’,अशा शब्दात नीलम ताई गोऱ्हे यांच्याबद्दल श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी गौरवोद्गार काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here