Home मुंबई आय इ एस शाळेमध्ये थर्मलीटीक स्क्रिनिंग स्तनाचा कर्करोग तपासणी उपक्रम

आय इ एस शाळेमध्ये थर्मलीटीक स्क्रिनिंग स्तनाचा कर्करोग तपासणी उपक्रम

201
0

आय इ एस शाळेमध्ये थर्मलीटीक स्क्रिनिंग स्तनाचा कर्करोग तपासणी उपक्रम

कांदिवली वार्ताहर

भारतीय स्त्री शक्ती, गृहलक्ष्मी महिला उद्योग तसेच जननी फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी थर्मलीटीक स्क्रिनिंग तपासणी उपक्रम राबविण्यात आला. कांदिवली चारकोप येथील  आय इ एस शाळेमध्ये आयोजित स्तनाचा कर्करोग तपासणी उपक्रमात 59 महिलांनी सहभागी होऊन तपासणी केली.

कांदिवली पश्चिम येथील आय इ एस शाळेमध्ये नाना पालकर स्मृती समितीच्या सहकार्याने थर्मलीटीक स्क्रिनिंग यंत्रणा व स्वयंसेवकांनी स्तनांचा कर्करोगाचा  धोका वेळीच ओळखता यावा, जेणेकरून कर्क रोगावर मात करता येईल या करिता तपासणी करून, काळजी कशी घ्यावी या बाबत मार्गदर्शन केले.

गृहलक्ष्मी महिला उद्योगाच्या सदस्या  पद्मजा आचार्य यांनी  उपक्रम सामाजिक आरोग्याच्या हिताचा आणि महिलांसाठी अतिशय महत्वाचा असल्याचे  सांगितले. महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी कर्करोग निदान शिबिरांची संख्या वाढवणार असल्याची माहिती नाना पालकर रुग्णालयाच्या टेक्निशियन तेजस्विनी रोकडे यांनी दिली. दैनंदिन धावपळीत महिला स्वतः च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत, जननी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश साळगावकर यांनी व्यक्त केली.

तपासणी उपक्रमात एकही निदान झाले नसल्याने महिलांनी समाधान व्यक्त करून नाना पालकर टीम चे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here