Home मुंबई छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा संयुक्त जयंती महोत्सव कामगार आयुक्तालयात साजरा.*

364
0

*छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा संयुक्त जयंती महोत्सव कामगार आयुक्तालयात साजरा.*

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा संयुक्त जयंती महोत्सव कामगार आयुक्त यांचे कार्यालय, बाष्पके संचालनालय,औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय हे तिन्ही कार्यालये मिळुन संयुक्तपणे साजरा करण्यात आला.

कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली व सह आयुक्त कामगार शिरीन लोखंडे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच बाष्पके संचालनालय,औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहयोगाने उपक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आयोजकांनी उत्तमरित्या पार पाडली.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस अधिकारी महासंघाचे नुकतेच निधन झालेले आदरणीय कुलथे सर यांना व पहलगाम येथे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, नीती आयोगाचे माजी सदस्य, माजी खासदार लाभले. त्यांनी ” भारतीय अर्थव्यवस्थेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि सद्यस्थितीत देशाच्या बजेट मधील एस. सी. व एस. टी.चा वाटा व त्याचे परिणाम ” या विषयाची सविस्तर मांडणी केली. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेबांचे अनेक पैलू नव्याने उलगडले.
हा संयुक्त जयंती महोत्सव सन २०१६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीपासून कामगार आयुक्तालयात साजरा करण्यात येत आहे आणि कार्यक्रमास दरवर्षी खूप चांगले वक्ते लाभले आहेत .


या उपक्रमाबद्दल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन शिरीन लोखंडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार अरुण कदम पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर सत्रात कामगार आयुक्त कार्यालय, बाष्पके संचालनालय कार्यालय, औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने विविध सामाजिक विषयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सदरीकरण केले त्यात भीम गीते,पोवाडे गायन स्पर्धा घेतली .तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यातील विजेत्यांना अरुण कदम यांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आली.
शिरीन लोखंडे, सह आयुक्त, कामगार याच्या नेतृत्वाखाली सुनीता म्हैसकर, कामगार उप आयुक्त, प्रविण कावळे, सहायक कामगार आयुक्त, सतिश तोटावार, सहायक कामगार आतुकत, निशा नागराळे, साहायक कामगार आयुक्त, विकास रोकडे, दुकाने निरीक्षक, प्रमोद कदम, पंकज माघाडे, आशा रसाळ, मृणाल मेश्राम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here