*चिपळूण न्यूज या युट्युब चॅनलच्या महिला पत्रकाराला का झाली मारहाण?*
*जिल्ह्यातील पत्रकार गप्प का?*
*सरकारने गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करावी..*
हल्ला झाला त्यावेळी या महिला पत्रकारासोबत एक निवृत्त मुख्याध्यापक .. मनसेने हाकलून दिलेली एक महिला पदाधिकारी व अन्य एक जण सोबत होता.
मूळात पत्रकारितेत स्टिंग ऑपरेशन करताना आपल्या वरिष्ठांना आणि पोलीसांना माहिती देऊन ते करायचे असते म्हणजे कोणताही जिवघेणा प्रकार घडत नाही.
अवैध वाळू उत्खननाबाबत रात्रीच्या वेळी चित्रीकरण करताना ही मारहाण झाली म्हणतात तर,
पोलिसांना या अवैध प्रकारांची माहिती असेल तर त्यावर कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्न उभे रहातात.
या सगळ्यांपैकी निवृत्त मुख्याध्यापक व महिला पत्रकार यांनाच मारहाण झाल्याने संशय निर्माण होत आहे ? इतर सोबत होते ते कुठे गेले?
पत्रकाराला पुढे करून आपला डाव साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतो आहे का…?
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी याआधी सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी व्यावसायिकांना ब्लॅकमेलिंग करण्याचे धंदे सुरू असल्याचे जाहीरपणे सांगितले होते, याबाबत चौकशी करण्याचे आदेशही दिले होते. काय झालं त्याचं? हे कळायला हवंच आणि अशा वाळू उत्खनन व कुणीही उठून पत्रकारालासोबत ‘रात्रीस खेळ चाले’ प्रकार करत असतील तर याला चाप बसायला हवा.
पालकमंत्री यांनी ठोस भूमिका घेणे आणि कारवाई करणे आवश्यक आहे.
महिला पत्रकारावर झालेला हल्ला हा कोणत्या. कटाचा भाग होता का?.याची कसून चौकशी व्हायला हवी.
आणि महिला पत्रकाराने बेसावधपणे अविचाराने त्याठिकाणी जाण्याची चूक केली असली तरी तिच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया च्या वतीने जाहीर निषेध करतो.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे
रत्नागिरी जिल्ह्यातून कोणत्याही पत्रकाराने अद्याप निषेध का व्यक्त केला नाही? का आहेत सगळे पत्रकार गप्प..?
एकूणच असे प्रकार होऊ नयेत म्हणून पोलीस व जिल्हा यंत्रणेने सतर्क राहून कठोर कारवाई करायलाच हवी.
सखोल चौकशी होऊन गुन्हेगारांवर आणि यामागील सूत्रांवर कठोर कारवाई व्हायला हवीच!
शीतल हरीष करदेकर
संस्थापक अध्यक्ष
मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया
7021616645

















