राजा नंगा आहे… मुख्य मीडिया शेखचिल्ली का बनलाय?
*मुकुटधारी राजा नागवा आहे…*
आमचे सहकारी, वरिष्ठ पत्रकार-संपादक के पी मलिक यांनी ‘राजा नंगा आहे’ हा लेख लिहिला आहे. तो आजच्या काळाला अगदी यथार्थ लागू पडो.
हीच ती गोष्ट आहे जी डॅनिश लेखक हॅन्स ख्रिश्चन अँडरसन यांनी १८३७ मध्ये लिहिले. त्याचे नाव आहे “सम्राटाचे नवीन कपडे” दोन धूर्त शिंपी सांगतात की आम्ही असे कपडे राजाला बनवू जे फक्त बुद्धिमानांनाच दिसतील. राजा आणि दरबारी लाजेखातर कपडे “खूप सुंदर आहेत” म्हणतात. पण वास्तविक राजा नागवा असतो. पण रस्त्यावर एक छोटं मूल ओरडतं, “अहो राजा तर नागवा आहे!” आणि संपूर्ण साम्राज्याचा भ्रम एका क्षणात तुटतो.
आजच्या काळात ‘पालक-विश्वस्त’असलेला नेता स्वतःला मुकुटधारी राजा म्हणून वावरतो तेव्हा त्याच्या बरोबर स्तुतीपाठक भाटांची फौजही असते. त्याच्या प्रत्येक कृतीला “होय बा” म्हणणारे आणि चूक न दाखवणारे असतात.
मुलाच्या ओरडण्याने संपूर्ण जनता लज्जित होते. पण राजा आणि भाट निर्लज्ज असतात. कारण स्वार्थाचा नागवेपणाच हे त्यांचे आत्मगान असते. त्यांना भानावर आणण्याचे काम एक लहान मूल करतं आणि मग खोट्या वैभवाचा इमला एका क्षणात ढासळतो.
गेले १२-१३ वर्षे या देशात एकच काम सुरू आहे. आयटी सेल, दुकानं, भाट, चाटुकार लोकांचा लोंढा आणला गेला. शिंपीची जागा आयटी सेल ने घेतली. त्याना काम एकच आहे, “अदृश्य दृश्य” विणणे. म्हणजे खोटा नरेटिव्ह, फेक न्यूज आणि ट्रेंड तयार करणे. दरबारची जागा सोशल मीडियाने घेतली. तेथे टाळी वाजवायला लाखो भाट आणि चाटुकार तयार आहेत. आणि सर्वात मोठ भयंकर काय तर आजचा मुख्य प्रवाह मीडिया पार गढूळ होत आहे शेखचिल्ली बनला आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावात तो प्रवाहपती बनतो आहे. लोकांना प्रश्न विचारण्याची आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा विचार त्याने सोडून चालणार नाही.
या लोंढ्यात प्रश्न विचारणारा ‘देशद्रोही’ ठरतो. चूक सांंगणारा नागरिक ‘विरोधी’ ठरतो. आणि राजा मुकुटावर नागवा फिरतो. कारण त्याला माहिती आहे, कोणीही ‘नागवा’ आहे असे म्हणणार नाही.
जानी, बात भयंकर है. अस्तित्व वाचवायचं असेल तर त्या अँडरसनच्या मुलाला स्वत:तिन्ही जिवंत ठेवणे आवश्यकआहे. जो राजा ला न घाबरता म्हणेल,राजा नागवा आहे.
के पी मलिक यांच्या ‘राजा नंगा है’ लेखाला सलाम ! आता सलाम म्हटल्यावर धर्म आणू नये कोणी.
“राजा नागवा आहे” ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. एका दरबारात फसवी चर्चा करत होते. पण एका लहान मुलाने आरडून सांगितले – “राजा तर नागवाच आहे!”
आज २०२६ मध्ये ही गोष्ट पुन्हा एकदा आठवते. कारण आजही आपल्या आजूबाजूला अनेक ‘राजे’आहेत. जे लोकांना स्वप्न दाखवतात, आश्वासनाचा डळमळता मंच उभारतात, आणि महान आहोत असे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.
*१. मोठ, वास्तविक काय ? *
आज सोशल मीडिया, जाहिराती आणि भाषणांचा भडीमार म्हणजे खरे आणि खोटे यातील रेषा पुसट आहे.
आकडे फुगवून सांगितले, योजना कागदावरच विसावतात.पण प्रश्न विचारणारा कोणीतरी दिसला की त्याला “नकारात्मक” किंवा “देशद्रोही” म्हटले जाते.
२. पूर्वी
दरबारात मंत्री होते. आज ट्रोल आर्मी आहे.
राजाने सांगितले तेच खरे. त्याच्यासाठी एक शब्दही नको.टीका केली की चारित्र्यहनन, जुने व्हिडिओ काढणे, आणि सोशल मीडियावर शिमगा करणे हेच होत.मग सामान्य माणूस गप्प बसतो. “आपल्याला काय करायचं” म्हणून बाजूला होतो.
*३. मुख्य मीडिया शेखचिल्ली प्रवाहपतीत*
आणि लोकशाहीत समस्या म्हणजे मीडिया.,
जो पुर्वी आरसा दाखवायचा आता शेखचिल्ली आहे.
पहा , माहिती पुर्ण नाही, पण TRP ची स्वप्न पाहतोय. एक प्रवाह, तास, तास चालवतात
बातमी नाही, फक्त नाच आहे. विश्लेषण नाही, फक्त आरडाओरड आहे.
*ते छोटं मूल अजूनही ओरडतंय – “राजा नागवा आहे!”*
पण प्रवाहपती मीडिया त्या मुलाचा आवाज दाबतोय. त्याला “नकारात्मक” ठरवतोय. आणि राजाच्या नवीन वस्त्रांचे गुणगान गातोय.
*४. तो लहान मुलगा आहे?*
“राजा नागवा आहे” हे सांगायला पुढे जाण्याचे धाडस कमी आहे
पत्रकारिता, साहित्यिक आणि सामान्य नागरिक – या तिघांनी प्रश्न विचारण्याचे सोडले आहे.
कारण प्रश्न विचारला की त्रास होतो. पण प्रश्न न विचारल्याने देशाचा आणखी मोठा तोटा होतो.हे वास्तव आहे.
●निष्कर्ष ●
राजकारण हे नाटक नाही. ते आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित आहे. पाणी, शिक्षण, आरोग्य – हे शब्द “वस्त्र” आहेत. जर तिथे जर कितीही मोठा मंच उभारला तरी उपयोग नाही.
आज पुन्हा एकदा त्या लहान मुलाची गरज आहे. जो घाबरणार नाही, जो चाटुगिरी करणार नाही, आणि जो स्पष्टपणे सांगेल – “हे चालले ते नाटक आहे, आणि राजा नागवा आहे.”
*प्रवाहपतीत बुडेल. पण प्रश्न विचारणारे लोक राहतात कायम*
डोेेळेउघडे ठेवा. प्रश्न विचारा. आणि खरे काय ते ओळखा.कारण पहात राजा आपण आहोत.
मुख्य मीडिया म्हणजे मेनस्ट्रिम मीडिया जे आपल्या माध्यमांच्या शक्तीच्या बाता मारतात. पण आसपास जे चालल ते सांगण्याचं धाडस न करता खोट्या ,अर्ध्या बातम्या देत असतील तर हे शेखचिल्लीच , जो तुमच्या बसण्याच्या फांदीवर कुर्हाडी मारतो , तुमचे अस्तित्व आंधळेपणाने पणाला लावतो.
पण सत्य सांगणे काळाची गरज आहे आणि राजानेही स्वतःलाच सुधरवण्याची गरज आहे.
#राजा_नागवा_आहे #लोकशाही #मीडिया #शेखचिल्ली #प्रश्न_विचारा


















