*गडचिरोली इथे वैनगंगा नदीच्या पात्रात काँग्रेसचे आंदोलन*
*चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला पाणी टंचाई भेडसावत असल्याने केले आंदोलन*
*काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आंदोलनाला उपस्थित,गोसीखुर्द धरणातील पाणी सोडण्यासाठी काँग्रेसने केले आंदोलन*
गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व मागास जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे.

गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली असून शेतकर्यांना शेती करायला अडचण निर्माण झाली आहे
नदी काठावरील गावातील भूजल पातळी सुद्धा कमी झाल्याने अनेक गावकर्याना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या असल्याने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन गोसीखुर्द धरणातील तातडीने पाणी सोडण्यात यावे ही मागणी करण्यात आली
या बरोबर आंदोलनातील इतर मागण्या :
• गडचिरोली येते होणाऱ्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा.
* भेंडाळा त. चामोर्शी परीसरातील MIDC करिता प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्याकरिता शासनाने अवलंबिलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असून शेतकर्याशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहीत करू नये.
* कोटगल बॅरेज करिता अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला संबधित शेतकर्यांना मिळाले नसून, योग्य तो मोबदला त्वरित देण्यात यावा व जे शेती बारमाही पाण्याखाली बुडीत क्षेत्रात येते अश्या शेतीस अतिरिक्त मोबदला देण्यात यावा.
* मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत असलेले मजुरीचे पैसे त्वरित देण्यात यावे.
• वडसा गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनधारक सर्व शेतकऱ्यांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला देण्यात यावा.


















