शिरीन संजू लोखंडे यांची शासनाने सह आयुक्त कामगार , महाराष्ट्र राज्य, या राज्यस्तरिय पदावर पदोन्नती
शिरीन संजू लोखंडे यांची शासनाने सह आयुक्त कामगार , महाराष्ट्र राज्य, या राज्यस्तरिय पदावर पदोन्नती केली असून त्या सदर पदावर रुजू झाल्या आहेत.
या पदावर पदोन्नती मिळालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी असून हा खूप मोठा सन्मान आहे.
पदोन्नती दिल्याबद्दल शासनाचे व कार्यालयातील सर्व सहकारि व सदैव पाठीशी उभे राहणारे कुटूंबातील सदस्य, मित्र – मैत्रीणी व आंबेडकरि चळवळीतील मित्र परिवार तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शुभेच्छा देणारे कामगार संघटना व विविध सामाजिक संघटना असे सर्व हितचिंतक यांचे त्यांनी आभार मानले. शाहु फुले आंबेडकरी चळवळीचा वारसा आपण या पुढेही असाच चालवत राहु आणि तळागाळातील कामगार वर्गाच्या ऊन्नतीसाठी काम करित राहु असा विश्वास त्यानी या निमित्ताने व्यक्त केला.























