Home पुणे दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष असताना रुग्ण दगावत असेल तर सरकारचा...

दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष असताना रुग्ण दगावत असेल तर सरकारचा काय धाक आहे हेच या रुग्णालयाने दाखवून दिले.

109
0

पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात पैसे दिले नाही म्हणून रुग्णाला दाखल करून घेतले नाही त्यात एक आईचा मृत्यू झाला. मंत्रालयातून फोन जाऊन देखील जर रुग्णालय इतकी असंवेदनशीलता दाखवत असेल तर या रुग्णालयाला चाप लावण्याची वेळ आली आहे.

आज भाजप आमदाराच्या जवळच्या व्यक्तीवर ही वेळ आली आहे,तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील? या निमित्ताने आरोग्य व्यवस्थेत सुरू असलेला माज चव्हाट्यावर आला आहे.राज्यात दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष असताना रुग्ण दगावत असेल तर सरकारचा काय धाक आहे हेच या रुग्णालयाने दाखवून दिले.

पुण्याचे मंगेशकर रुग्णालय हे सरकारने आपल्या ताब्यात घेण्याची वेळ आली आहे, या प्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. इतक्या असंवेदनशील लोकांची रुग्णालयात काम करण्याची पात्रता नाही. आता तरी सरकार म्हणून जागे व्हा,सामान्य लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना धडा शिकवा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here