Home Uncategorized *स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना* *मोठं घर मिळावं हा माझा गुढीपाडव्याचा संकल्प*

*स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना* *मोठं घर मिळावं हा माझा गुढीपाडव्याचा संकल्प*

91
0

*भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे प्रतिपादन*

मुंबई- गुढीपाडवा म्हणजे केवळ नववर्ष नव्हे तर नवीन संकल्प करण्याचा दिवस. या दिवशी अनेकजण संकल्प करतात. भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनीही स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना विशेषतः मराठी माणूस जो चाळीत राहतो त्याला मोठं घर मिळावं हा माझा गुढीपाडव्यानिमित्ताने संकल्प असल्याचे प्रतिपादन केले आहे.

माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले कि, महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाचे भले व्हावे व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा हा आमचा सार्वत्रिक संकल्प निश्चित आहे. पण मुंबईत गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास ही एक चळवळ, अभियान म्हणून मी हातात घेतलेय. ज्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, सरकारचा राजाश्रय आहे. या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला विशेषतः मराठी माणूस जो मोडकळीस आलेल्या चाळीत राहतो त्याला स्वयं पुनर्वीकासातून मोठं घर मिळावं व या अभियानाने मोठी गती घ्यावी हा माझा संकल्प आहे. तसेच लाडक्या बहिणींना १५०० रूपये प्रतिमहा सरकार देतेय. त्या १५०० चे १५ हजार कसे होतील हाही माझा संकल्प आहे. मुंबई बँकेने धोरण आणलेय त्या धोरणा अंतर्गत १० हजार, २५ हजार अंक एक लाख अशा प्रकारे विना तारण लाडक्या बहिणींना अत्यल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून त्यांचे १५०० चे १५ हजार कसे होतील व त्या उद्योजक कशा होतील हा नवा संकल्प करत असल्याचे दरेकर म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीवर बोलताना दरेकर म्हणाले कि, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची आमची इच्छा आहे. विरोधी पक्षाला केवळ टीका करण्याचेच काम आहे. एका बाजूला अर्थसंकल्पावर बोलताना देशावर, राज्यावर कर्ज झालेय असे बोलतात आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही मागणी करतात. हा दुटप्पीपणा आहे. जसजशी राज्याची आर्थिक स्थिती मजबूत होईल तसे जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधील राहू.

संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले कि, संघ ही भाजपाची मातृ संस्था आहे. आपल्या घरात जाण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज लागत नाही. पंतप्रधान मोदी स्वतः संघाच्या विचारसरणीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. पंतप्रधान म्हणून ते संघाच्या कार्यलयात गेले असतील तर त्याचा आनंद सर्वांना आहे फक्त संजय राऊत यांच्याच पोटात दुखतंय, असा टोलाही दरेकरांनी लगावला.

तसेच संजय राऊत यांनी मेळावे होईपर्यंत तोंडाला चिकटपट्टी लावली पाहिजे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे काय बोलणार हे सभा झाल्यावरच समोर येणार आहे. परंतु संजय राऊत यांना धीरच नाही. राज ठाकरे संध्याकाळी भुमिका जाहीर करणार आहेत त्यानंतर राऊत बोलले तर त्याला अर्थ आहे. फक्त चर्चेत राहायचे हा राऊत यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टिकाही दरेकरांनी केली.

कोल्हापूर येथे छत्रपती शिवरायांचा गनिमी काव्याने बसवलेल्या पुतळ्याबाबत बोलताना दरेकर म्हणाले कि, हा संवेदनशील विषय आहे. कायद्याच्या नियमात बसून पुतळा बसवावा. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. त्यांचा पुतळा बसविताना सर्व प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here