Home Uncategorized *महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुद्धगयेत सुरू असलेल्या बौद्ध भिक्खूंच्या आंदोलनाला भेट देऊन केंद्रीय...

*महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुद्धगयेत सुरू असलेल्या बौद्ध भिक्खूंच्या आंदोलनाला भेट देऊन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिला जाहीर पाठिंबा*

287
0

*महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळविण्याचा आठवलेंनी केला निर्धार*

बुद्धगया दि.28 –
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुद्धगयेत भिक्खूंच्या चाललेल्या आंदोलनाला आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला.

महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 हा रद्द झाला पाहिजे.महाबोधी महाविहार ट्रस्ट चे चेअरमन सेक्रेटरी आणि सर्व सदस्य बौद्ध असले पाहिजे अशी आपली मागणी असून त्यासाठी बिहार विधानसभेत महाबोधी टेम्पल ऍक्ट रद्द झाला पाहिजे.या मागणी साठी आपण उद्या बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्यपाला मा.मोहम्मद आरिफ खान यांची भेट घेणार असल्याचे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.

बुद्धगयेत मागील 45 दिवसापासून सुरू असलेल्या बौद्ध भिक्खूंच्या आंदोलनाला आपण 50 हजार रुपयांची तातडीने मदत देत असल्याचे ना.रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले.
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भदंत नागार्जुन सुरई सुसाई यांनी आंदोलन केले तेंव्हापासून आपला या आंदोलनाला पाठिंबा आहे.मी बौद्ध आहे .माझा रिपब्लिकन पक्ष हा या आंदोलनात सक्रिय सहभागी आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आहे.महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळवणारच असा आपला निर्धार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले.यावेळी भदंत प्रज्ञाशील ; भंते आकाश लामा आणि अनेक भंते यावेळी उपस्थित होते.रिपब्लिकन पक्षाचे शिव मिश्रा; विजय गुप्ता आणि कल्याण चे देवचंद आंबादे,मुंबईतून रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव; सुबोध भारत आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here