लक्ष्मीकांत घोणसेपाटील गुहागर
कोकणात शिमगोत्सव सुरु झालाय आणि या शिमगोत्सवातील संकासुर हा प्रमुख आकर्षण असतो.
कोकणातील शिमगोत्सवात खरे रंग भरतात ते इथले नमन आणि खेळे आणि खेळ्यांमध्ये संकासूर हे मुख्य आकर्षण असतो…गुहागर तालुक्यातील अडूर येथे श्री सुंकाई देवीचा नमन मंडळाकडून संकासुराची अनोखी परंपरा जपली जातेय.संकासुराची ‘पाठलाग’ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळतेय. सुंकाई देवीच्या मानाच्या होळीच्या दिवशी मंदीर परिसराता खेळे सादर केले जातात आणि त्यानंतर होळी पेटवली जाते…पेटत्या होळी भोवती मानकरी आणि खुम होळीभोवती धावतात आणि त्यांना पकडण्यासाठी एकटा संकासूर हा आगीतून आणि निखा-यातून धावत असतो…असा हा खेळ गेली अनेक वर्षांपासून अडूर या गावात खेळला जातोय…अडूर येथील साणेवर हा सगळा खेळ पहायाला मिळतो…संकासुराला काढा आणि ओरडून डिवचलं जातं आणि त्या मानक-यांना पकडण्यासाठी संकासूर हा होळीच्या आगीतून आणि निखा-यातून धावत असतो…संस्कृती आणि परंपरेचा वारसा हा कोकणात शिमगोत्सवादरम्यान पहायला मिळतो.


















