कालची भांग संजय राऊत यांची उतरलेली नाही असं मी म्हणणार नाही कारण रोजच संजय राउत नशा करुन वक्तव्य करत असतात…..
पुथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः ह्या गोष्टींचा इन्कार केलेला आहे त्यांनी नकार दिलेला आहे
पण मला संजय राऊतांना प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्हाला माहित होतं की एकनाथ शिंदे साहेब कॉंग्रेस मध्ये जाणार होते तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं ?नगरविकास मंत्री का बनवलं ? म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का ?
उद्धव ठाकरे घाबरत होते, त्यांच्यावरती खाद्यावरती जबाबदारी टाकुन तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत होतात जर ते कॉंग्रेस मध्ये जाणार होते तर म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात त्यांची लोकप्रियता पाहुन तुम्ही घाबरत होतात त्यांची लोकप्रियता आहे हे तुम्ही मान्य केलं होतं.
संजय राऊत, ज्या झाडाला फळं लागतात त्याच झाडाला लोक दगड मारतात.
आता एकनाथ शिंदे यांच्याच मागे का सर्व पक्ष लागले की तुम्ही आमच्या सोबत या कारण जनते मध्ये ते फार लोकप्रिय आहेत …..!!

















