Home मनोरंजन ३२ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘हरवलेल्या पत्यांचा बंगला’ प्रथम पारितोषिक

३२ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘हरवलेल्या पत्यांचा बंगला’ प्रथम पारितोषिक

190
0

*३२ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत*

 *हरवलेल्या पत्यांचा बंगला* *प्रथम पारितोषिक*

मुंबई : ३२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‍जिगिषा क्रिएशन्स या संस्थेच्या *हरवलेल्या पत्यांचा बंगला* या नाटकासाठी रुपये ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केली . सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे-

अवनीश, अथर्व, नाटकमंडळी या संस्थेच्या *आमने सामने* या नाटकास रुपये ४ लाख ५० हजाराचे द्वितीय पारितोषिक ; मकरंद देशपांडे नाटकवाला व व्ही आर प्रॉडक्शन्स या संस्थेच्या *सर, प्रेमाचं काय करायचं* या नाटकास रुपये ३ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दिग्दर्शन :- प्रथम पारितोषिक (रु.१,५०,०००/-) चंद्रकांत कुलकर्णी (नाटक-हरवलेल्या पत्यांचा बंगला)

                  द्वितीय पारितोषिक (रु.१,००,०००/-) मकरंद देशपांडे (नाटक-सर, प्रेमाचं काय करायचं)

                 तृतीय पारितोषिक (रु.५०,०००/-) ‍निरज शिरवईकर (नाटक-आमने सामने)

नाट्यलेखन : प्रथम  (रु.१,००,०००/-) स्वरा मोकाशी (नाटक- हरवलेल्या पत्यांचा बंगला)

                     द्वितीय (रु.६०,०००/-) ‍निरज शिरवईकर (नाटक- आमने सामने)

                     तृतीय  (रु.४०,०००/-) मकरंद देशपांडे (नाटक- सर, प्रेमाचं काय करायचं)

प्रकाश योजना :

 प्रथम  (रु.४०,०००/-) अमोल फडके (नाटक- सर, प्रेमाचं काय करायचं)

 द्वितीय  (रु.३०,०००/-) किशोर इंगळे-मयुर इंगळे (नाटक- आमने सामने   तृतीय  (रु.२०,०००/- शिवाजी शिंदे (नाटक-प्रेम करावं पण जपून)

नेपथ्य : प्रथम  (रु.४०,०००/-) टेडी मौर्या (नाटक- सर, प्रेमाचं काय करायचं)

द्वितीय  (रु.३०,०००/-) प्रदीप मुळे (नाटक-तू म्हणशील तस)

  तृतीय  (रु.२०,०००/-) प्रदीप मुळे (नाटक-व्हॅक्युम क्लीनर)

संगीत दिग्दर्शन :

प्रथम (रु.४०,०००/-) अशोक पत्की (नाटक- हरवलेल्या पत्यांचा बंगला)

 द्वितीय  (रु.३०,०००/-) शैलेश बर्वे (नाटक- सर, प्रेमाचं काय करायचं)

तृतीय  (रु.२०,०००/-) मनोहर गोलांबरे (नाटक-दर्याभवानी)

वेशभूषा : प्रथम  (रु.४०,०००/-) अमीता खोपकर (नाटक- आमने सामने)

  द्वितीय  (रु.२०,०००/-) प्रतिमा जोशी (नाटक-हरवलेल्या पत्यांचा बंगला)

तृतीय  (रु.२०,०००/-) कलीका विचारे (नाटक- दर्याभवानी)

रंगभूषा : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) उल्लेश खंदारे (नाटक- व्हॅक्युम क्लीनर)

 द्वितीय  (रु.३०,०००/-) उदयराज तांगडी (नाटक- दर्याभवानी)

   तृतीय  (रु.२०,०००/-) उल्लेश खंदारे (नाटक- हरवलेल्या पत्यांचा बंगला)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.५०,०००/-

पुरुष कलाकार : रोहन गुजर (नाटक-आमने सामने), मंगेश् कदम (नाटक-आमने सामने), विशाल तांबे (नाटक-प्रेम करावं पण जपून), मकरंद देशपांडे (नाटक-सर, प्रेमाचं काय करायचं), निनाद लिमये (नाटक-सर, प्रेमाचं काय करायचं).

स्त्री कलाकार : वंदना गुप्ते (नाटक-हरवलेल्या पंत्याचा बंगला), दिप्ती लेले (नाटक-हरवलेल्या पंत्याचा बंगला), लिना भागवत (नाटक-आमने सामने), निर्मिती सावंत (नाटक-व्हॅक्युम क्लीनर), आकांक्षा गाडे (नाटक-सर, प्रेमाचं काय करायचं)

दि. २६ फेब्रुवारी ते ०७ मार्च २०२४ या कालावधीत श्री शिवाजी मंदिर, दादर, मुंबई या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ०७ व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिवदास घोडके, रवींद्र आवटी, विजय कदम, प्रदीप कबरे व मुग्धा गोडबोले यांनी काम पाहिले.

           सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या व्यावसायिक नाटकाच्या निर्मात्यांचे तसेच इतर सर्व पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या नाट्यनिर्मात्यांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here