आज दि. 08 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे महिलांचा सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी स्मिता जयकर , अर्चना नेवरेकर, श्रेया बुगडे, मानसी नाईक, सोनाली खरे या अभिनेत्री तर ऋतुजा सुर्वे तबलावादक, अपूर्वा निषाद पार्श्वगायिका, विद्या कंठी हार्मोनियम वादक,कविता पौडवाल पार्श्वगायिका यांच्या सह सूरमयी वातावरणात आणि महिला भाविकांच्या लक्षणीय उपस्थितीत सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी , न्यासाचे विश्वस्त राहुल लोंढे, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे, मनीषा तुपे, न्यासाच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील, उपकार्यकारी अधिकारी डॉ संदीप राठोड, वित्त व लेखा अधिकारी मनाली सावंत आदी मान्यवर उपस्थितीत होते.






















