विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवनार डम्पिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या विविध आरोग्य समस्यांबाबत मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधून कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गाचे जालना ते नांदेड मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून जनतेसाठी मार्ग खुला करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे केली आहे.
राज्यात १०२४ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, २०२२ ते २०२४ पर्यंतची नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झाली नाही ती त्वरित द्यावी. तसेच विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून बळीराजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी तरतूद करण्याची मागणी केली आहे.

















