Home महाराष्ट्र *खालसा झालेल्या जमिनी वाचण्यासाठी काय उपाययोजना करणार?-*विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा राज्य...

*खालसा झालेल्या जमिनी वाचण्यासाठी काय उपाययोजना करणार?-*विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा राज्य सरकारला प्रश्न

126
0

*विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा राज्य सरकारला प्रश्न*

मुंबई: मराठवाड्यातील खालसा झालेल्या बेनामी जमिनी वाचवण्यासाठी काय उपाययोजना करणार असल्याचा प्रश्न विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात उपस्थित केला. खालसा झालेल्या बेनामी जमिनी खासगी व्यक्तीने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून स्वतःच्या ताब्यात अथवा काही ठिकाणी अतिक्रमण केल्या,असल्याची माहिती यावेळी त्यांनी सभागृहात दिली.

सदरील जमिनी देवस्थानच्या ताब्यात देण्यात याव्या, अशी सूचना सर्वोच्य न्यायालयाने दिलेली असताना सरकारने या सगळ्या जमिनी वेगवेगळ्या वर्गवारीत हस्तांतरित केल्या आहे.खासगी व्यक्ती किंवा विकासकांच्या हातात या जमिनी लागू नये, यासाठी आगामी काळात महत्वपूर्ण उपाययोजना कराव्या लागतील, अशी सूचना दानवे यांनी केली.

राज्य सरकार करत असलेल्या नियमांचा शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यात यावी.तसेच खीदमतमाज मध्ये अनेकदा विश्वस्त बदल केले जातात. विश्वस्त बदलला तरीही खासगी व्यक्तींना देवस्थानच्या जमिनींवर इतर विकासात्मक कामे करता नाही आली पाहिजे, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here