Home Uncategorized *कामगार मंत्री ॲड .आकाश फुंडकर यांच्यामार्फत सहायक संचालक पदभरतीसाठी नियुक्तीपत्रांचे वाटप*

*कामगार मंत्री ॲड .आकाश फुंडकर यांच्यामार्फत सहायक संचालक पदभरतीसाठी नियुक्तीपत्रांचे वाटप*

87
0

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र राज्याच्या कामगार विभागाच्या अधिपत्याखालील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक संचालक, गट-ब या पदांवरील नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरतीद्वारे ४४ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती.

सदरहू शिफारसप्राप्त ४४ उमेदवारांपैकी विहित अर्हतेनुसार पात्र ठरलेल्या ३२ उमेदवारांना दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी नियुक्ती देण्यात आली. तथापि, काही उमेदवारांनी वैयक्तिक कारणास्तव नियुक्ती नाकारली, तर काही जण उप संचालक, गट-अ या उच्च पदावर नियुक्त झाले. तसेच, काही उमेदवार विहित कालावधीत पदस्थापनेसाठी हजर राहू शकले नाहीत.

यामुळे शासनाने अशा उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करून, संबंधित प्रवर्गानुसार प्रतीक्षायादीतील ४ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्याची विनंती आयोगास केली. आयोगाने शासनास या ४ उमेदवारांची शिफारस केली असून, कामगार मंत्री ॲड. आकाश पांडुरंग फुंडकर यांनी या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार, सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून आज दिनांक ३ मार्च २०२५ रोजी कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांच्या हस्ते या चार उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

कामगार विभागात नव्या अधिकाऱ्यांच्या या भरतीमुळे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून, राज्यातील औद्योगिक सुरक्षेसंबंधी उपाययोजनांना गती मिळणार असे कामगार मंत्री ॲड.फुंडकर यावेळी म्हणाले.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here