मुंबई, दि. 23 : अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कामगार कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत दरवर्षी केंद्र शासन व राज्य शासन मध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता राज्य – राष्ट्रीय पातळीवर विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
अखिल भारतीय नागरीसेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने यावर्षी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन श्रीशिवछत्रपती क्रीडापीठ महाळुंगे – बालेवाडी पुणे, येथे दिनांक १७ ते २१ फेब्रुवारी, २०२५ रोजी करण्यात आले होते. याकरिता आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्यशासन यांच्या वतीने सचिवालय जिमखाना मुंबई यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत विविध राज्यांचे २२ संघ व ६७३ खेळाडू विविध वजन गटामध्ये सहभागी झाले होते.
राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन २००५ नंतर यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे करण्यात आले होते. दिनांक १६ फेब्रुवारी, २०२५ रोजी सर्व संघांचे व्यवस्थापक व प्रशिक्षक यांची बैठक दुपारी चार वाजता पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन दिनांक १७ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी १० वाजता चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्त, पुणे, सतीश जोंधळे, सभापती सचिवालय जिमखाना, मुंबई, दमय्यावार, अवर सचिव, शालेय शिक्षण, क्रीडा व युवक सेवा, मुंबई, स्पर्धा समन्वयक जोगिंदर सिंग, दिल्ली, स्पर्धा सचिव संजय कदम, स्पर्धा सहसचिव, अरुण पाटील, क्रीडा अधिकारी तसेच तांत्रिक समिती प्रमुख, संदीप वांजळे या मान्यवरांच्या हस्ते पार पडले. सचिवालय जिमखाना मानद सचिव संजय पोफळे यांनी महाराष्ट्र राज्य शासन कुस्ती संघाची निवड चाचणी ५ फेब्रुवारी, २०२५ रोजी लालबहादूर शास्त्री व्यायाम शाळा, मध्य रेल्वे माटुंगा, मुंबई, या ठिकाणी आयोजित केली. या चाचणीद्वारे महाराष्ट्र राज्य शासनाचा कुस्ती संघ निवडण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी निवड चाचणीमध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्पर्धेची पूर्वतयारी करण्यासाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षण शिबिर १३ ते १५ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत श्रीशिवछत्रपती क्रीडापीठ महाळुंगे – बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. निवडण्यात आलेला संघ १७ ते २१ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला. या संघातील सर्व खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून महाराष्ट्रासाठी १५ पदकांची कमाई केली.
*महाराष्ट्र संघाचे ग्रीक रोमन स्टाईल पदक विजेते खालील प्रमाणे*
१. ५५ किलो वजन गट संकेत इंगळे रोप्य पदक
२. ६० किलो वजन गट धनंजय महाडिक रौप्य पदक
३. ६३ किलो वजन गट सुभाष पाडेकर सुवर्णपदक
४. ७२ किलो वजन गट महेश घुले रौप्य पदक
५. ८२ किलो वजन गट विजय नरळे कास्यपदक
६. ८७ किलो वजन गट आनंदा खाने कास्य पदक
७. ९७ ते १३० किलो वजन गट नईम शेख कास्यपदक
*फ्री स्टाईल संघाचे पदक विजेते खालील प्रमाणे*
१. ९७ किलो वजन गट समर्थ पाटील कास्य पदक
२. ९७ ते १२५ किलो वजन गट हनुमंत खरात रौप्य पदक
*महिला संघातील पदक विजेते खालील प्रमाणे*
१. ५५ किलो साक्षी इंगळे रौप्य पदक
२. ६२ किलो प्रियंका येरुडकर रौप्य पदक
३. ५९ किलो मनीषा रायकर कास्य पदक
४. ६५ किलो निर्जला मोघाडे कास्य पदक
५. ६८ किलो कोमल गोळे सुवर्णपदक
६. ७२ किलो मनीषा दिवेकर रौप्य पदक
या स्पर्धेचे बक्षीस वितरण दीपक शिवानंद पांडे (IPS), अप्पर पोलीस महासंचालक, दळण वळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन पुणे, रुस्तम ए हिंद पै.अमोल बुचडे, राष्ट्रीय स्पर्धा समन्वयक, जोगिंदर सिंग, स्पर्धा सचिव संजय कदम, स्पर्धा सहसचिव संजय पोफळे, सचिवालय जिमखाना पदाधिकारी सर्वश्री.सतीश सोनवणे, मकरंद गायवळ, मारुती कवलदार, सचिवालय जिमखाना माजी महासचिव प्रकाश चौधरी, माजी पदाधिकारी विजय चव्हाण, पांडुरंग पाटील, शिवाजी कोळी व इतर मान्यवर यांच्या हस्ते पार पडले.
अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र पुरुषाने सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त केले, तसेच महाराष्ट्र महिला संघाने देखील सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त केले. याबद्दल सचिवालय जिमखाना, मुंबईचे सभापती सतीशजी जोंधळे, अरविंदजी शेटे (मानद महासचिव), संजय कदम (स्पर्धा सचिव),
संजय पोफळे, स्पर्धा सहसचिव, मकरंद गयावळ, मारुती कवलदार, सतीश सोनवणे, श्रीमती मंगल नाखवा, प्रवीण मुंडे, प्रताप माडकर यांसह सचिवालय जिमखाना आजी माजी सर्व पदाधिकारी सभासद यांनी महाराष्ट्र संघाच्या यशाबद्दल भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
000


















