Home पत्रकारवार्ता - माई *जाळून टाका अशी भंगार आरोग्य सेवा* *केईएमचा मुर्दाडखाना*..

*जाळून टाका अशी भंगार आरोग्य सेवा* *केईएमचा मुर्दाडखाना*..

214
0

*माझा हरीष ८तास तडफडत संपला!*
*पत्रकाराच्या नवऱ्याला अशी वागणूक सामान्यांचे काय?*

माझा नवरा हरीष करदेकर
याला १३फेब्रुवारी ला रात्री केईएम ला एडमीट केले
तो.अनकाँशनस फिरत होता.ओरडत होता

इमरजनसी.वाँर्ड.२०ला नीट उपचार झाले नाहीं.
पोटातल पाणी काढून अल्ब्युमिन व इतर इजेक्शन दिले नाही.

सोनोग्राफी ला लाईन
2४ऩबर.च्या बाहेर माझा नवरा सव्वा तासतडफडला ओरडत होता.
जनावरं बरी ती जवळ येऊन माया दाखवतात.
असंवेदनशील मस्तवाल नर्स डॉक्टर्स!
सोनोग्राफी२४ नंबर ला
तपासणी मशीन एकच डॉक्टर !
इथले काम, पेशंट वाऱ्यावर सोडून दुसरीकडे इमर्जन्सी ला गेलेले.
इमरजन्सीचे डॉक्टर आपापसात आपल्या अंतरगत वाद, ताण ,लोड व आपल्या पेशंट च्या लिस्ट करण्यात जास्त व्यस्त!
इमरजन्सी मधे काम कसं वेगाने व्हायला हवं,
हे आपण खूप काम करतोय अस़ं दाखवत एकेका पेशंटसाठी अर्धा
तास घालवत होते कागदावर इतिहास लिहित होते.
वेदनेने ओरडणारा माझा नवरा त्यांच्यासाठी शून्य होता.
नर्सना तर बोलण्याची शिस्त नाही.
रागावून ओरडून बोलणे हा यांच्या सेवेचा धर्म?
आमच्या पैशांवर उभी असलेली ही यंत्रणा अगदी भिक्कार निर्दयी आणि कोणाचेही नियंत्रण नसलेली कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावी अशी भंगार आहे.

माझ्या नवऱ्याच्या
सगळ्या तपासणी करुन पुन्हा इमरजनसी वाँर्ड २०ला आम्ही आलोः आमची पेशंटचे स्ट्रेचर ओढत!

पाऊण तास डाँ कधी तपासणी. करुन औषधे देतील वाट पाहिली
आतल्या नर्सने डॉक्टर कडून ट्रान्सफर व औषधे लिहून आणा सांगितले.
डॉक्टरांना मी विनंती करत होते माझ्या नवरऱ्याची फाईल,त्याला पहा !मी कोलमडण्याच्या अवस्थेत!
प्रचंड संताप होत होता त्याबरोबर माझा नवरा तडफडतोय ही वेदना !हतबल …यदतीसाठी फोन करत होते…सीएमओ नक्की काय करतात?
डीनची जबाबदारी काय?
कोण किति माती खातोय ।…हे पहाणे ..नियंत्रण हे भगवान भरोसे?

डाँक्टरने गंभीर पेशंटवर उपचार का केले नाहीत?
माझा नवरा सिरियस होता तर तातडीने तपासुन उपचार का केले नाहीत?
माझा नवरा वाचलाच पाहिजे!असं आक्रोशत होते.
माझा नवरा ४वाजता शांत झाला,मला वाटलं थकून झोपला असेल!तेव्हा महिला डॉक्टर ने त्याचं नाव पुकारले!
धावत पुढे गेले,
हरीष चं ब्लड प्रेशर तपासलं काहीच दिसेना,शुगर चेक करायला घेतली ,त्याची बोटं निळी पडलेली. मी म्हटलं, काय तपासता य आता? तो थंड पडलाय!”
मोठ्या तत्परतेने तिने हरीष ला वेनटिलेटर लावला!अंगाखाली थंडगार स्टिलचे स्ट्रेचर!
कडक गार एसी!
मी दोन चादरींची कशीतरी १०मिनिटांत व्यवस्था करुन हरीषच्या अंगावर टाकल्या !
एक हात इजेक्शन लावलेल्या सुईचा आधारहिन,माझा मुलगा धरुन उभा.
अशा अवस्थेत पेशंटचे ब्लड प्रेशर कसे वाढणार होते?
या अशा डॉक्टर नर्सना फ्रिजमधे एक तास ठेवून तडफडवले पाहिजे.😡😡
नंतर जे घडलं.ते.सांगेनच

पण चार वाजता गार पडलेल्या हरीषला साडेसात वाजता मयत घोषित केले.

षंढ यंत्रणा. ..गेंड्याच्या कातडीचे निब्बर असंवेदनशील मानसिकतेचे …हे आरोग्य सेवक कसला माज घेऊन काम करतात?

सरकारचे मनपाचे नियंत्रण नाही!
इथे येणाऱ्या पेश़ंट व नातेवाईकांना भिकाऱ्यासारखी वागणूक मिळते…तर अशा भिक्कार लोकांना सेवेच्या कामात कुठेहि स्थान नसावे!

माझ्या सारख्या पत्रकाराला माझ्या नवऱ्याला अशा यातना मिळाल्या!हरीष ८तास तडफडून आमच्या समोर निर्जिव झाला!
ही माझ्या नवऱ्याची हत्या आहे.
जबाबदार सगळ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवीच!

शीतल करदेकर
7921616645

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here