Home महाराष्ट्र माणगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लंडन हाऊस प्रतिकृती व होलोग्रफिक...

माणगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लंडन हाऊस प्रतिकृती व होलोग्रफिक शोचे लोकार्पण

150
0

माणगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लंडन हाऊस प्रतिकृती व होलोग्रफिक शोचे लोकार्पण

हातकणंगले / प्रतिनिधी

       डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सन्मान भूमि माणगाव येथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन हाऊस च्या प्रतिकृती व होलोग्रफिक शोचे लोकार्पण करण्याचे भाग्य लाभले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माणगांव परिषद राष्ट्रीय स्मारक ” अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून पहिल्या टप्प्यात बनवण्यात आलेल्या लंडन हाऊस व होलोग्राफिक शो यांचा जाहीर लोकार्पण सोहळा प्रसंगी केले.

     माणगाव ता . (हातकणंगले) येथे १९२० साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज यांच्या उपस्थितीत जगातील पहिली अस्पृश्य परिषद माणगाव येथे घेण्यात आली होती. त्या परिषदेस आप्पासाहेब पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.परिषद घेतलेल्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या लंडन हाऊसची प्रतिकृती सध्या उभारण्यात आली आहे. तसेच माणगाव परिषदे चा होलोग्रफिक शो तयार करण्यात आला आहे. कोरोना महामारी मुळे गेली अनेक वर्षे लोकार्पण सोहळा लांबला होता.या सोहळ्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माणगावचे सरपंच राजू मगदूम तत्कालीन उपसरपंच अख्तर भालदार,सामाजीक कार्यकर्ते शिरीष मधाळे यांच्या सह ग्रामस्थांनी कांही दिवसा पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले होते.

      आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लंडन हाऊस प्रतिकृती व होलोग्रफिक शोचे लोकार्पण सोहळा पार पडला.

     यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षि शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत येऊन हा लोकार्पण सोहळा करण्याचे भाग्य लाभले तसेच होलोग्राफीक शो पाहून प्रत्यक्ष शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष बोलताहेत असे दुर्मिळ क्षण पाहण्याचे अहोभाग्य लाभले.यासारखा मोठा आनंद नाही इथल्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी स्वतःच्या जमिनी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.  अनेक श्रीमंत लोक आहेत मात्र देण्याची दानत लागते ती इथल्या लोकांच्या मनात आहे.

ज्या लोकांनी ही जागा दिली आहे त्यांना लवकरच मुंबई येथे बोलावून त्यांच्या साठी ही सरकारने काहीतरी करण्याची भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी  व्यक्त केली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक व उर्वरीत कामासांठी १९९ कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.त्यामध्ये ग्रंथालय अभ्यास केंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास असलेल्या शाळेचे नूतनीकरण आदी कामे नियोजित आहेत. याच बरोबर मुंबई येथील इंदूमिल मधील बाबासाहेबांचे स्मारक देखील जगाला हेवा वाटेल असे निर्माण करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here