रेल्वे व्यवस्थापनाचे नूतनीकरण.. प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष…
*छप्पर आणि लोंबकळणाऱ्या केबल्स…रेल्वेचा गलथान कारभार…*
कांदिवली / अनिल चासकर
कांदिवलीत रेल्वे व्यवस्थापनाने फलाट, बाहेरील परिसर आणि छप्पर यांचे नूतनीकरण सुरु केले आहे. फलाट एक नंबर वरती काही ठिकाणी छप्पर नाही तसेच पुष्कळ केबल्स लोंबकळत असल्याने प्रवाशांना उन्हाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच लोंबकळणाऱ्या केबल्स मुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. रेल्वे व्यवस्थापनाने लवकरात लवकर छप्पर टाकून लोंबकळणाऱ्या केबल्स योग्य पद्धतीने बांधव्यात अशी मागणी महिला रेल्वे प्रवाशांनी केली आहे.
महापालिके प्रमाणे रेल्वे प्रशासनाने देखिल बहुतांशी फलाट वर आणि आजूबाजूच्या परिसराची कामे सुरु केली आहे. कांदिवलीत दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. फलाट क्रमांक एक वरील काही भागाचे छप्पर काढले आहे. प्रचंड प्रवाशी संख्या असल्याने फलाट वर लक्षणीय गर्दी असते. छप्पर नसल्याने योग्य डब्बा पकडण्यासाठी उन्हात ताटकळत उभे रहावे लागत आहे. सदर फलाट वरील केबल्स खाली आणि योग्य रीतीने बांधल्या नसल्याने लोंब कळताना दिसून येतात.महिला डब्ब्याच्या परिसरातील केबल्स जास्तच खाली असल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरते. कामाला गती दिली असली तरी
कामात सुसूत्रता नसल्याने त्याचा नाहक त्रास रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
**स्टेशनं अधिक्षक ओम प्रकाश – टप्प्या टप्प्याने काम होत आहे ,संबंधिताना सांगून केबल्स व्यवस्थित करण्यात येतील.**
महिला रेल्वे प्रवाशी सविता देसाई यांनी आपली खंत व्यक्त करताना सांगितले की, “फलाट क्रमांक एक वर प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. उन्हाचा तडाखा वाढला आहे. याचा विचार करून लवकरात लवकर छप्पर लावावे आणि केबल्स थोड्या वरती बांधव्यात जेणेकरून महिला प्रवाशांच्या मनात भीती राहणार नाही.”




















