Home मुंबई अपघातग्रस्त मासेमारी नौका मालकाला १८ लाख ५५ हजाराची नुकसान भरपाई* मुख्यमंत्री...

अपघातग्रस्त मासेमारी नौका मालकाला १८ लाख ५५ हजाराची नुकसान भरपाई* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

166
0

*अपघातग्रस्त मासेमारी नौका मालकाला १८ लाख ५५ हजाराची नुकसान भरपाई*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

मुंबई,दि.१६ : मासेमारी नौकेला मुंबईतील समुद्रात चीनच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने मासेमारी नौकेचे नुकसान झाले होते. त्या मालवाहू जहाजाच्या कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. या नुकसान भरपाईचा
१८ लाख ५५ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकसानग्रस्त नौकेच्या मालकाला आज प्रदान करण्यात आला.

 

मंत्रालयात मंत्री परिषद संपल्यानंतर नुकसानग्रस्त नौका मालकाला धनादेश देण्यात आला. या वेळी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

मुंबई समुद्रात हेमदीप टिपरी यांच्या मालकीच्या तिसाई या मासेमारी नौकेला २८ डिसेंबर २०२४ रोजी मालवाहतूक जहाजाने धडक दिली होती. या धडकेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मासेमारी नौकेचे मोठे नुकसान झाले होते.स्थानिक परवाना अधिकारी,सागरी पोलीस,बंदर निरीक्षक व मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष पंचनामा केला गेला होता.त्यानुसार रुपये १८ लक्ष ५५ हजार इतक्या नुकसान झाले असल्याचे सांगितले.

बंदरे विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार संबंधित जहाज कंपनी व अपघातग्रस्त नौका मालक यांची बैठक बोलवण्यात आलेली. त्या बैठकीत कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते.

००००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here