महाड – जवळपास 3 वर्षे उलटूनही रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावातील रहिवाशांचे पूर्णतः पुर्नवसन झाले नाही. जे काही नागरिक येथे वास्तव्यास आले आहेत, ते मूलभूत सोयी सुविधांअभावी वंचित आहेत. त्यामुळे दरडग्रस्त तळीये गावातील समस्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गावकऱ्यांना दिली.
२२ जुलै २०२१ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पाहणी करून दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली वाहिली.

पुनर्वसित गावास भेट देऊन गावकऱ्यांना दिलेल्या घरांना भेट दिली. निर्माण झालेले घर उत्तम दर्जाचे असली तरीही अद्यापही संपूर्ण घराचे बांधकाम झालेले नाही. त्यातही दरडग्रस्त रहिवाशांना घरकुल मंजूर झालेले नाही. या राहिलेल्या रहिवाशांना घरकुल मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यात यावा तसेच पाणी, वीज, रस्ते व इतर सोयीसुविधा तातडीने गावकऱ्यांना मिळण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

तसेच येथे 100 घरे जरी दिली असली तरी डोंगराळ भागतील वाड्यावस्तीत राहणारे गावकरी अजून येथे राहण्यास आले नाही. भविष्यात अशा दुर्घटना घडू नये, यासाठी शासनाने पावले उचलणे आवश्यक असताना शासनाने त्यांचे पुर्नवसन का केले नाही की शासन अजून अशा दुर्घटना होण्याची वाट बघत आहे का असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
याप्रसंगी कार्यकरी अभियंता सलोनी निकम, प्रांत अधिकारी
ज्ञानेबा बनापुरे,तहसिदार महेश शितोळे, शिवसेना दक्षिण रायगड संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड, जिल्हाप्रमुख नंदूशेठ शिर्के, माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप,उपजिल्हाप्रमख पद्माकर मोरे, विधानसभा प्रमुख अमित मोरे, विधानसभा संघटक धनंजय देशमुख, सुभाष मोरे व आशिष पळसकर उपस्थित होते.


















