*या सोहळ्यात पत्रकार दिनाच्या निमित्ताने शीतल करदेकर ,सचिन चिटणीस,मंदार जोशी ,कपिल देशपांडे,बिपिन कुलकर्णी या मान्यवर पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.*
*याप्रसंगी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी “रंगकर्मीं कलाकार व पत्रकार एकत्र आले तर खूप चांगलं काम होऊ शकतं.रंगकर्मींच महामंडळ झाले तेव्हा आम्ही पुढाकार घेतला होता.आता पत्रकारांच्या महामंडळासाठी कलाकारांच्या शुभेच्छांची गरज आहे.”असे आवाहन केले .*
*अभिनेते प्रसाद ओक व स्वप्नील जोशी यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या . तर प्रसाद ओक यांनी पत्रकारांचे महामंडळ व्हावे अशी ईश्वरचरणी व मा मुख्यमंत्र्यांकडे प्रार्थना केली.*
मागील वर्षी १००व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन,पुणे येथे ऐतिहासिक घटना घडली होती.
उद्घाटनाच्या व्यासपीठावर रंगमंचावर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा मा ना उदय सामंत यांच्या पुढाकाराने आमच्या विनंतीवरून लावला गेला.
तसेच नाट्य दिंडीचे काही क्षण भोई होण्याचा मान आम्हा पत्रकारांना मिळाला.
या वर्षी मा गणेश गारगोटे यांच्या पुढाकाराने जिलबी चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित कार्यक्रमात स्टेजवर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा कार्यक्रमात ठेवण्यात आली .
प्रत्येक मान्यवरांनी आचार्यांना वंदन केलं.
पहाताना खुप अभिमान वाटत होता आनंदही झाला.
पत्रकार महामंडळासाठी अभिनेता प्रसाद ओक यांनी ईश्वर व मुख्यमंत्र्यांकडे प्रार्थना केली.
आणखी काय हवं असतं आपल्याला!
मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) पत्रकारितेचा झेंडा सतत सन्मानाने उंचावत राहील
आपलं अस्तित्व आदराने नमूद होणं हाच खरा सन्मान!
🙏
शीतल करदेकर



















