Home Uncategorized मुंबईकरांकडे अक्षम्य दुर्लक्ष,बेस्ट इलेक्ट्रिसिटीचा प्रचंड ढिसाळ कारभार !अनेेक विजबिल भरणाकेंद्र निद्रिस्त! कर्मचाऱ्यांचा...

मुंबईकरांकडे अक्षम्य दुर्लक्ष,बेस्ट इलेक्ट्रिसिटीचा प्रचंड ढिसाळ कारभार !अनेेक विजबिल भरणाकेंद्र निद्रिस्त! कर्मचाऱ्यांचा तुटवडा!

182
0

बेस्टचे मुंबई मध्ये विद्युत बिल भरणा केंद्र उत्तर आणि दक्षिण मिळून 110 केंद्र आहेत त्यापैकी फक्त 58 केंद्र सद्या चालू आहेत.

विद्युत पुरवठा विभागातील बेस्टचे आर्थिक उत्पन्न वाढवणारे विभाग म्हणून बेस्ट मध्ये वीज ग्राहक विभाग असून त्यामध्ये मीटर वाचक,बिल वाटणारे बिल वितरक आणि विद्युत बिल घेणारे रोख भरणा केंद्रावरील लिपिक कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला असल्याने बेस्ट कडे ग्राहक रुपी पैसे येत आहेत पण ते घेण्यासाठी माणसे नाहीत.
सद्या बेस्ट मध्ये विद्युत पुरवठा विभागातील 9 विभाग असून त्यामध्ये चुनाभट्टी पासून ते कुलाबा बॅकबे पर्यंत 11 लाख वीज ग्राहक वर्ग आहेत.त्यांचे प्रथम दैनंदिन मीटर वाचन होते,त्यानंतर त्यांचे बिल छपाई होऊन बिल वितरण होते आणि त्यानंतर ग्राहक बिल भरण्यासाठी बेस्टच्या वीज बिल भरणा केंद्रावर येत असतात.

नियोजनबध्द खच्चीकरण…
●मीटर वाचक 450 होते सद्या 150 पर्यंत कर्मचारी शिल्लक आहे.
●बिल वितरक एकूण 400 पर्यंत होते सद्या 180 पर्यन्त कर्मचारी शिल्लक आहेत.
●रोख भरणा केंद्रावर एकूण 190 कर्मचारी होते सद्या 58 कर्मचारी शिल्लक आहेत.
●MERC नियमानुसार ARR मध्ये बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागात कामगार भरती करण्यासाठी परवानगी दिली असताना सुद्धा

●गेले वर्षभर झाले बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागात अश्या आर्थिक उत्पन्न वाढविणाऱ्या विभागात प्रशासन कर्मचारी भरती करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here