Home मुंबई वाचन संकल्प महाराष्ट्राचा”उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे शिखर ग्रंथालय – राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात

वाचन संकल्प महाराष्ट्राचा”उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे शिखर ग्रंथालय – राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात

201
0

“वाचन संकल्प महाराष्ट्राचा”उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे शिखर ग्रंथालय – राज्य मध्यवर्ती ग्रंथालय,

महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय यांच्या दि. २० डिसेंबर, २०२४ च्या परिपत्रकानुसार “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम दरवर्षी १ जानेवारी ते १५जानेवारी या कालावधीत सर्व विद्यार्थी/ विद्यार्थीनी, तसेच सर्व वाचक यांच्यासाठी वाचन पंधरवडा राबविण्यात येणार आहे.


या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे शिखर ग्रंथालय – राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई येथे दि. 30/12/2024 रोजी  ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर  यांच्या शुभहस्ते ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाने करण्यात आला.


दि. ०१जानेवारी, २०२५  रोजी नवीन वर्षाची सुरूवात म्हणून राज्य मध्यवर्ती ग्रंथालय मुंबई येथील भव्य दिव्य वाचन कक्षात तसेच ग्रंथालयाच्या बाहेरील ऐतिहासिक पायऱ्यांवर बसून आपल्या आवडीच्या पुस्तकाच्या सामुहिक वाचनाने करण्यात आली. या सामुहिक वाचन कार्यक्रमात ग्रंथालय संचालक  अशोक गाडेकर, ग्रंथपाल  शालिनी इंगोले, लेखाधिकारी  योगेश पिंपळे, ग्रंथालय संचालनालय व राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील सर्व कर्मचारी कर्मचारी वर्ग, विद्यार्थी / विद्यार्थीनी तसेच सर्व वाचक सहभागी झाले होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करताना संचालक  गाडेकर यांनी ‘मानवी जीवनाच्या विकासात वाचनाचे महत्व’ अधोरेखीत करून वाचन संस्‍कृती वाढविण्यास व बळकट करण्यास नवनवीन संकल्पना मांडल्या. तसेच त्यांनी सर्व विद्यार्थी, कर्मचारी आणि वाचक यांना पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन केले. या समुह वाचनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना ग्रंथभेट देऊन प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  शालिनी इंगोले यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन† सुजाता माहुलकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here