Home मुंबई “शिवस्मारक फक्त दिखावा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान!”

“शिवस्मारक फक्त दिखावा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान!”

172
0

२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या दिमाखात शिवस्मारकाचे जलपूजन केले, पण त्या जलपूजनानंतर आठ वर्षे उलटून गेली तरी स्मारकाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. शिवरायांच्या नावाचा केवळ राजकीय लाभासाठी केलेला वापर हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे.

शिवरायांचा आदर फक्त घोषणांनी किंवा जाहिरातींनी होणार नाही. शिवस्मारकाचे काम प्रलंबित ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्या केंद्र सरकारच्या ढोंगी शिवभक्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो.

आता महाराष्ट्र उठेल! शिवरायांच्या विचारधारेवर चालणाऱ्या या महाराष्ट्रात, शिवस्मारकाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. पोलीस नोटिसा पाठवून आम्हाला गप्प करण्याचा प्रयत्न होत आहे, पण आम्ही कोणत्याही दबावाला घाबरणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली उद्या, २४ डिसेंबर २०२४, रोजी “अस्मिता जागृती आंदोलन” होणार आहे. हे आंदोलन महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवरायांच्या वारसाने उचललेले पाऊल आहे.

स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई
वेळ: सकाळी १०:३० वाजता

महाराष्ट्राच्या अस्मितेला न्याय देण्यासाठी आपल्या कर्तव्याला जागा! शिवस्मारकाच्या निर्मितीसाठी आणि महाराष्ट्राच्या अभिमानासाठी आवाज उठवा!

#शिवस्मारक_कधी?
#शिवरायांचा_अपमान_सहन_होणार_नाही
#महाराष्ट्राची_अस्मिता
#अस्मिता_जागृती_आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here