शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे सरकार सत्तेवर-वि प नेते अंबादास दानवे
सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार*
नागपूर – शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार
करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे हे सरकार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे







यांनी करत सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याचे दानवे यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला
नागपूर येथील रविभवन येथे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले.

- ईव्हीएमच्या आधारावर हे सरकार आलं आहे. सोयाबीन, कापसाला भाव न देणारं हे सरकार आहे, दुधाचे भाव घसरलेले हे सरकार आहे. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था करणारे हे सरकार असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि समस्या हे सभागृहात जोरदर ताकदीने मांडणार असल्याची,ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
- यपरभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यावर उमटलेल्या पडसादानंतर झालेल्या कोंबिग ऑपरेशन दरम्यान अटक केलेल्या सोमनाथ सोमवंशी या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाला. अशा सर्व घटना घडत असताना मुख्यमंत्री हे
मिरवणुकीत गुंतले आहेत, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
सरकारचे या सर्व घटनांकडे लक्ष आहे की नाही, असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला.
नवीन सरकार आल्यावर विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यावर तीन आठवड्याचे अधिवेशन असेल, ही वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती. विदर्भातील जनतेची अपेक्षा होती त्याला हरताळ फासले गेले अशी टीका आ विजय वडेट्टीवार यांनी केली.
सोयाबीनला हमीभाव नाही, धानाला भाव नाही, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी अपेक्षा होती. हे अधिवेशन अधिक कालावधी साठी चालवावे, अशी मागणी
वडेट्टीवार यांनी केली.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली. त्यांचे प्रेत नासण्याचे काम हत्येक-यांनी केले, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
सोयाबीन खरेदी केंद्र अजून सुरू झाले नाहीत.
शेतकरी कर्जमाफीची भूमिका सरकारने स्पष्ट करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ नेते जितेंद्र आव्हाड, आ विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू, आमदार महेश सावंत, आमदार ज.मो. अभ्यंकर उपस्थित होते.

















