कल्याण
२०२४-सूरताल कराओके च्या उपक्रमात भव्य राज्यस्तरीय कराओके गाण्यांची स्पर्धा.
स्नेहा घोसाळकर हे गायन क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे . गायन क्षेत्रात प्रसिद्धी मिळाली असली तरी शास्त्रीय गायन त्या अजूनही शिकत आहेत शास्त्रीय गाण्याबरोबरच त्यांचा लोकगीत भावगीत भक्तीगीत व चित्रपटातील हिंदी मराठी गाणी गाण्यातही त्यांचा हातखंडा आहे पती संतोष घोसाळकर यांनाही गायनाची व संगीताची आवड असल्यामुळे त्यांचे स्नेहा घोसाळकर यांना चांगलेच सहकार्य लाभले आहे
कल्याण पश्चिमत आणखी गायक कलावंत तयार व्हावेत या उद्देशाने त्यांनीं मे २०२२या वर्षी सुरताल कराओके क्लबची स्थापना केली व आतापर्यंत या अडीच वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक गायक कलाकारांना मार्गदर्शन केले आहे तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व गायनाची संधी मिळावी याकरिता अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजनही केले*
त्यांच्या एका कार्यक्रमाला माजी आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते,त्यांचा कार्यक्रम पाहून त्यांनी दिवाळी पहाट हा कार्यक्रम त्यांना दिला व रसिकांना तो अतिशय आवडला.हे सर्व करीत असताना आपल्याच कलाकारांचा विचार न करता इतर सर्व कलाकारांना गायनाची संधी मिळावी याकरिता कल्याणात प्रथमच भव्य राज्यस्तरीय कराओके स्पर्धेचें आयोजन त्यांनी केले आहे
१६ वर्षावरील सर्वांसाठी ही स्पर्धा असून सहभाग प्रवेश शुल्क फक्त रुपये १००.रु.ठेवले आहे . सहभाग घेणाऱ्या सर्व गायक स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे
बक्षिसांची रक्कम पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक रू.३३३३
द्वितीय क्रमांक रु.२२२२
तृतीय क्रमांक रु.११११
उत्तेजनार्थ रु ७५१.प्रमाणे २-पुरस्कार
त्याच बरोबर सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र,शिवाय विशेष उत्तेजनार्थ ५ गायक कलावंतांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे
स्पर्धेचा दर्जा चांगला असावा याकरिता ऑडिशन प्राथमिक फेरी उपांत्य फेरी व अंतिम फेरी या ३विभागात स्पर्धा होणार आहेत
स्पर्धेची प्राथमिक फेरी
दि १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०:३०ते दुपारी १:३०वा व* *सायंकाळी ५ते ९ तसेच दि १६डिसेंबर ते२१डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ते७:३०.वाजे पर्यंत होईल
उपांत्य फेरी दि २२डिसेंबर रोजी सकाळी१०:३०-ते१:३० सायंकाळी५ते ९या वेळेत होईल
तसेच दि२३डिसेंबर ते २६ डिसेंबर सायंकाळी ५ते ९या वेळेस आनंदी गोपाळ बिल्डिंग,तळमजला, पारनाका कल्याण पश्चिम,या ठिकाणी होणार आहे
स्पर्धेची अंतिम फेरी रविवार दि २९-डिसेंबर २०२४रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेस देवज्ञ भवन हॉल, लक्ष्मीनारायण मंदिर, डॉ.अन्सारी चौक, जलाराम फरसाण च्या पुढे गांधी चौक कल्याण पश्चिम येथे घेण्यात येणार आहे
स्पर्धा संपल्यानंतर लगेचच पुरस्कार वितरण सोहळा होइल
प्रार्थमिक फेरीतून निवड झालेल्या कलाकारांना उपांत्यफेरीचे प्रवेश शुल्क रुपये-२५० भरावयाचेआहे.अंतिम फेरीत निवड झालेल्या कलाकारांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.ऑनलाइन फॉर्मच्या व्यतिरिक्त क्यूआर कोडवर्र देखील प्रवेश शुल्क भरता येईल
क्यू आर कोड वर पैसे पाठविल्यास स्क्रीन शॉट,नाव,शहर,व वय पुढील मोबाईल क्रमांका वर पाठवावे
मोबाईल-क्रमांक ९८६९९३०६१६
स्पर्धेसाठी मराठी व हिंदी गाणी गाऊ शकता.ऑडिशन प्राथमिक फेरी व उपांत्य फेरीत गाण्याचा फ़क्त मुखडा व अंतरा गायचा आहे
अंतिम फेरीत पूर्ण गाणे गायचे आहे*.
सर्व ट्रॅक आयोजकांकडे उपलब्ध आहेत तरी कुणाला ट्रॅक डाऊनलोड करून आणायचे असतील तर त्याला परवानगी आहे*.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील
आयोजनात फेरबदल करण्याचा अधिकार आयोजक संस्थेला राहील याची कृपया नोंद घ्यावी
अधिक माहितीसाठी संपर्क:-स्नेहा घोसाळकर ९८६९९३०६१६
अनंत कामत ९७७३६२३६८६
अर्चना खटावकर ८३५६००३८३९
रत्नाकर तेलंग ९६५३४८३८३४.
सर्व कलाकारांनी स्पर्धेत सहभाग घेऊन ह्या स्पर्धेचा आनंद घ्यावा व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन संचालिका स्नेहा घोसाळकर व रंगकर्मी व सुरताल क्लबचे सदस्य शिवाजी शिंदे यांनी केले आहे


















