Home मुंबई विधानपरिषदेचे ६ विद्यमान सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी ; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...

विधानपरिषदेचे ६ विद्यमान सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी ; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडून शुभेच्छा

188
0

विधानपरिषदेचे ६ विद्यमान सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी ;
उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडून शुभेच्छा

मुंबई दिनांक २६ नोव्हेंबर,(प्रतिनिधी) :-
नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत विधानपरिषदेचे विद्यमान ६ सदस्य विजयी झाले आहेत. मुंबईचा एकाचवेळी दोन सदनांचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९५७ च्या अनुच्छेद ३ नुसार या नवनिर्वाचित ६ विधानसभा सदस्यांना विधानपरिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राजपत्रात प्रसिध्द होताच आपोआप त्यांचे अगोदरचे विधानपरिषदेचे सदस्यत्व रद्द होते. १) आमश्या पाडवी, शिवसेना, २) प्रवीण दटके, भाजपा,३) चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा, ४) राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ५) रमेश कराड, भाजपा आणि ६) गोपीचंद पडळकर, भाजपा हे विधानपरिषदेचे विद्यमान ६ सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी झाले आहेत. विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद सदस्य असलेल्या आणि आता विधानसभेवर निवडून गेलेल्या या ६ सदस्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here