महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत मुंबईत एकूण १० हजार ११७ मतदार केंद्रांमध्ये मतदान होत आहे. यापैकी शहर भागात २ हजार ५३८ तर उपनगर भागात ७ हजार ५७९ मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी वेब कास्टिंग संनियंत्रण कक्षातून ३६ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.तसेच आवश्यक ते निर्देश दिले.

विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग कॅमेरे बसवण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, नियोजनपूर्ण व्हावी आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वेबकास्टिंग द्वारे विशेष काळजी घेतली जात आहे. मतदान केंद्रांवर मतदान सुरू होण्यापूर्वीपासून ते मतदान संपेपर्यंतच्या सर्व घडामोडींचे चित्रिकरण केले जात आहे. त्यामुळे कोणत्याही मतदान केंद्रावरील कोणत्याही क्षणाची दृश्ये पाहता येणे शक्य आहे.
माननीय भारत निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना वेब कास्टिंगची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर बारकाईने नजर ठेवता येणे शक्य आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत मुंबईत एकूण १० हजार ११७ मतदार केंद्रांमध्ये मतदान होत आहे. यापैकी शहर भागात २ हजार ५३८ तर उपनगर भागात ७ हजार ५७९ मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त व प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी वेब कास्टिंग संनियंत्रण कक्षातून ३६ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.तसेच आवश्यक ते निर्देश दिले.