Home मुंबई कोळी बांधवांना त्यांच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड करून देणार- आदित्य ठाकरे* *प्रभू...

कोळी बांधवांना त्यांच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड करून देणार- आदित्य ठाकरे* *प्रभू श्रीराम जिथे जिथे गेले होते तिथून भाजप हरली*

120
0

*मविआ शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर, उदेश पाटेकर समीर देसाई यांच्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात*

*कोळी बांधवांना त्यांच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड करून देणार- आदित्य ठाकरे*

*प्रभू श्रीराम जिथे जिथे गेले होते तिथून भाजप हरली*

*मुंबई

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या प्रचाराचा झंजावात मुंबईत सुरू आहे . आज दहिसर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनोद घोसाळकर, मागाठाणे मतदारसघांचे उमेदवार उदेश पाटेकरआणि गोरेगाव मतदारसंघाचे समीर देसाई, यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा पार पडली . यावेळी या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणा असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी दहिसर,मागाठाणे आणि गोरेगावच्या मतदारांना केलं.


सभेदरम्यान मनात अनेक आठवणी दाटून आल्या. या आठवणी जपतच आपल्याला पुढे जायचंय, असा विश्वास व्यक्त केला . तसेच गेल्या दोन वर्षात रोज ह्या राज्यात निघणारे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे थांबवण्यासाठी आपली सत्ता यायलाच हवी . प्रत्येकाच्या हृदयात मशाल पेटायलाच हवी, हा जनतेच्या मनातील निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला .

*कोळी बांधवांना त्यांच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड करून देणार- आदित्य ठाकरे*

आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की ‘अडाणींच अजून एक भूत आपल्या डोक्यावर म्हणजे मुंबईतल्या कोळीवाड्यांवर बसवलं जातंय. कोळी बांधवांसाठी डीसीपीआरमध्ये रूल वगळायला पाहिजेत  . कोळीवाड्यातले प्रश्न वेगळे आहेत . पण आपल्या जिल्ह्यातले कोळीवाडे या सरकारला बिल्डरच्या घशात घालायचे आहेत . सब भूमी गोपाल की असं म्हणतात, तसं भाजपवाले बोलतात सब भूमी अदानी की . इथले खासदार पियुष गोयल मच्छी मार्केट मधून जात असताना वास आला म्हणून तोंडाला रुमाल लावतात. त्यांना कोळी बंधवांशी काही देणं घेणं नाही . मात्र मी इथल्या कोळीवाड्यांच्या विकासासाठी लढणार . इथले कोळी बांधव प्रॉपर्टी कार्ड मागत आहेत, तर त्यांच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड करून देणार, असा विश्वास व्यक्त केला .

*प्रभू श्रीराम जिथे जिथे गेले होते तिथून भाजप हरली*

केंद्र सरकार बहुमतात असताना हिंदू खतरे में आहे असं बोलतात , तर भाजप सत्तेत नसलेली बरी . असं म्हणत कटेंगे तो बटेंगे आणि एक  हैं तो सेफ या भाजपच्या नेत्यांच्या वाक्याशी मी सहमत आहे .  कारण भाजप आपला खिसा कापेल आपल्याला एक राहायला हवं असं आदित्य ठाकरे म्हणाले . तसचं भाजप इथे हिंदू मुस्लिम वाद घडवण्याचा प्रयत्न करतोय . आणि कुठलं मंदिर अपूर्ण असताना आपण त्याचं उद्घाटन करतो ? त्याला पाप समजतात . आणि प्रभू श्रीराम जिथे जिथे गेले होते तिथून भाजप हरली . असं आदित्य ठाकरे भाषणात म्हणाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here