*मुंबईत वेगवेगळ्या ३ मतदार संघात आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराचा झंजावात*
*वरळीतील आदित्य ठाकरे यांच्या प्रचारफेरीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सहभागी*
जे गब्बर झाले ते गद्दार झाले आणि गुहाटीला जाऊन नाचले
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज कुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रविणा मोरजकर, कलिना विधानसभेचे उमेदवार संजय पोतनीस आणि वांद्रे पूर्वेचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्या झालेल्या सभांमध्ये जनतेला मशालीलाच मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले . यावेळी महिलांच्या मान- सन्मानासाठी, महाराष्ट्राभिमान जपण्यासाठी, आपल्या मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी मशालीशिवाय पर्याय नाही, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना केलं .
आदित्य ठाकरे यांच्या प्रचारफेरीत वरळी येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सहभागी झाले होते . तर मुंबईतील इतर तीन मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या प्रचार सभा पार पडल्या . यावेळी तीनही ठिकाणी झालेल्या सभेला आणि प्रचार फेरीमध्ये शिवसैनिक आणि मुंबईकरांनी प्रचंड संख्येने उपस्थिती लावून विजयाचा विश्वास दिला .
*जे गब्बर झाल ते गद्दार झाले आणि गुहाटीला जाऊन नाचले*
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन ‘बटेंग तो कटेंगे’ सांगतायत , पण ते बरोबर सांगत आहेत , आपण एक राहिलं पाहिजे, असं आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना केलं . आणि गेल्या अडीच वर्षातला आपला लढा महत्वाचा आहे, गद्दाराना माफ करणार नाही . असा इशारा गद्दारांना दिला . तसेच आपली लढाई ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जे गद्दार टेबल वर चढून नाचले त्याच्या विरोधात आहे. त्यांना तुम्ही निवडून देणार का ? असा जनतेला सवाल केला . तसेच जे गब्बर झाल ते गद्दार झाले आणि गुहाटीला जाऊन नाचले . हे निर्लज्ज गद्दार आहेत हे उद्धव ठाकरेंचे झाले नाही ते तुमचे काय होणार ? जे माकडा सारखे नाचले त्यांना तुम्ही निवडून देणार का ? असं जनतेला आवाहन करताना सवाल आदित्य ठाकरेंनी केले .























