Home मुंबई अदानीच्या घश्यात धारावी घालायचं काम- आदित्य ठाकरे

अदानीच्या घश्यात धारावी घालायचं काम- आदित्य ठाकरे

141
0

लुटीसाठी मुंबई महापालिका निवडणुक तुम्ही घेतली नाही का? आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबई

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मां. आमदार आदित्यजी ठाकरे मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली . या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी धारावी संदर्भातील सरकारच्या भ्रष्ट धोरणाबाबत टीका केली . यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘मुलुंड मध्ये PAP प्रकल्प अजून सरकारने रद्द केलेला नाही . फक्त मिहीर कोटेचा म्हणतात तो प्रकल्प रद्द होणार आहे . पण धारावी प्रोजेक्ट मधे ७०% जमीन BMCची आहे . त्यामुळे प्रीमियम मिळताना ५ हजार कोटी मुंबई महापालिकेला मिळायला हवेत .. त्याचबरोबर १ ते २ हजार कोटी म्हाडाला मिळायला हवे होते . मात्र हे पैसे अदानी स्वतःला घेणार आहेत . ते पैसे BMC, म्हाडाला मिळणार नाहीत . असं सरकारचं भ्रष्ट धोरण आदित्य ठाकरे यांनी जनतेसमोर आणलं..
वीस दिवसात MMRDAने १५ हजार कोटी रुपयांचा टेंडर काढल . ४० हजार कोटीची थकबाकी कॉन्ट्रॅक्टरची आहे . आता हे कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करणार आहेत . धारावीतील प्रकल्पातील लँड प्रीमियम मुंबई पालिका आयुक्तांनी का घेतला नाही ? हा जनतेचा पैसा आहे, आणि याच करणासाठी तुम्ही मुंबई महापालिका निवडणुक तुम्ही घेतली नाही का ? १ आठवडा झाला आयुक्ताना पत्र दिलं आहे , पण अजूनही उत्तर दिलेल नाही . अदानीच्या घश्यात धारावी घालायचं काम सरकार कडून सुरु आहे . मिंदे सरकार कडून लूट सुरु आहे . मिंदेच नगरविकास खाते आणि  BMC लूट करत आहे असं म्हणत पालिका आयुक्तांच्या बेजबाबदार आणि निष्क्रिय वर्तणुकीवर बोट ठेवतानाच सरकारचाही समाचार आदित्य ठाकरे यांनी घेतला .

*आमचं सरकार आल्यावर वांद्रेपूर्वेतल्या शासकीय वसाहतीच्या रहिवाश्यांना मालकी हक्काची घरं देणार*

वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमधील रहिवाशी गेल्या ४ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत . या उपोषणस्थळी आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली . ग. क्वा. रे. असोसिएशनतर्फे रहिवाशांचे गेले चार दिवस मालकी हक्कासाठीचे घर, भूखंड मिळण्याकरिता आमरण उपोषण सुरू आहे . महाविकास आघाडी सरकार काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांनी वाद्रे असोसिएशनसाठी भूखंड मंजूर केला होता. मात्र सरकार बदलताच इतर प्रकल्पांप्रमाणेच या प्रकल्पाची कार्यवाही रखडली . त्यामुळे आपलं सरकार आल्यावर पाठपुरावा करून नक्कीच न्याय मिळवून देऊ, असा विश्वास उपोषणकर्त्यांना आदित्य ठाकरे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here