Home मनोरंजन सिरियल किलर भाऊ कदम १२ ऑक्टोबरला होणार नव्या नाटकाचा शुभारंभ

सिरियल किलर भाऊ कदम १२ ऑक्टोबरला होणार नव्या नाटकाचा शुभारंभ

163
0

नाटकाच्या पोस्टरचे अनावरण ना दीपक केसरकर व सिध्दार्थ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

अभिनेते भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा हा शार्प शूटर ‘सिरियल किलर’ ठरला आहे. अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक येत्या शनिवारी १२ ऑक्टोबरला रंगभूमीवर दाखल होत आहे. यात भाऊ कदम यांची मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्या जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे,तेजस पिंगुळकर या नाटकात धमाल उडवणार आहेत.

मालिका अभिनेत्री आणि रिपोर्टर यांच्यामध्ये घडलेल्या घटनेने संशयाचे सुरुंग पेरले जातात. या घटनेनंतर ‘सिरियल किलर’ म्हणून आलेला खरंच ‘सिरियल किलर’ असतो की नसतो ? याचा धमाल खेळ रंगतो. फुल टू कॉमेडीच्या रॅपरमध्ये गुंडाळून आलेला ‘सिरियल किलर’ काय धमाल उडवतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.

‘बेभान कॉमेडी आणि निखळ आनंदासोबतच आमच्या सगळ्यांच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट देणारं ‘सिरियल किलर’ हे नाटक प्रेक्षकांना निखळ आनंद देईल’ असा विश्वास अभिनेते भाऊ कदम व्यक्त करतात. ‘नाट्यरसिकांना नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न अद्वैत थिएटर्सने केला आहे. ‘सिरियल किलर’ च्या माध्यमातूनही आम्ही सस्पेंस धमाल अशी नाट्यकृती आणली असून भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी हे नाटक मनोरंजनाची दिलखुलास पर्वणी असणार आहे’.

नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे तर संगीत विजय गवंडे यांचे आहे. प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची आहे. सूत्रधार सुनील पानकर गोट्या सावंत आहेत.

त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शनिवार ५ ऑक्टोबर* कोस्ट अँड ब्लूम*
२रा मजला, कोहिनूर स्केअर,शिवसेना भवन समोर, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) येथे पत्रकर परिषदेचे आयोजन करण्यात आले .

याप्रसंगी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना दीपक केसरकर  आवर्जून उपस्थित राहिले.आपल्या सिंधुदुर्गातील नाटकाच्या टीमचे त्यांनी कौतुक केले.तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल ते भरभरुन बोलले.मुंबई तून  मराठी भाषाभवन बाहेर जाणार होते  ते आम्ही  थांबवले आणि आता मुंबई तच मोठे भाषाभवन उभे रहात असून यात एक उत्तम नाट्यगृह असेल असेही  त्यांनी सांगितले.मुंबईत मराठी नाट्य सृष्टीसाठी नेहमीच मदतीला  असू हा विश्वास त्यांनी  मुंबईचे पालकमंत्री म्हणून  दिला.

यावेळी पत्रकारांनी दामोदर नाट्यगृह व भारतमाता चित्रपटगृहाबाबत ना केसरकरांना प्रश्न  विचारला.तेव्हा दामोदर नाट्य गृहासाठी आमची नेहमीच मदत असेल . मुंबईतील सांस्कृतिक बळकटीसाठी पुर्ण शक्तीने काम करु असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ना केसरकर व सिध्दार्थ कांबळे यांच्या हस्ते नाटकाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

मुंबई बँकेचे उपाध्यक्ष  सिध्दार्थ जाधव म्हणाले की मुंबई बॅक नेहमीच मराठी माणूस  व मराठी नाट्य सृष्टीसाठी सहकार्य करत आली आहे. नाट्य परिषदेचे तेव्हाचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळी यांना. नाट्य संकुलासाठी जागा मा शरद. पवार साहेब यांनी दिली. संकुलासाठी मदत केली मुंबई बँकेने ही आठवण त्यांनी सांगितली.

यावेळी निर्माता राहुल भंडारे, प्रणय तेली, लेखक-दिग्दर्शक केदार देसाई, *विनोदवीर भाऊ कदम अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे, तेजस पिंगुळकर* उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here