Home Uncategorized एसटीच्या सेवानिवृतांच ७ आंँक्टोबर ला होणारे आंदोलन तुर्तास स्थगित

एसटीच्या सेवानिवृतांच ७ आंँक्टोबर ला होणारे आंदोलन तुर्तास स्थगित

295
0

ठाणे-

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने  मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी  राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयां समोर आपल्या अनिर्णित प्रश्नांसाठी दि ७ आँक्टोबर या दिवशी आत्मक्लेश आंदोलन करत असल्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन एल्गार पुकारला होता….
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांनी आंदोलनाची तातडीने दखल घेत सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर राज्यभरात सेवानिवृत्तांच होणारं आंदोलन तुर्तास स्थगित करत असल्याचे सरचिटणीस सदानंद विचारे यांनी सांगितले..

ईपीएस ९५ बाबत योग्य तो निर्णय महामंडळस्तरावर घेतला जाईल..
कामगार करारात मंजुर झालेल्या तरतुदीनुसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतीपुर्ती महामंडळाने करावी या बाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत तपासुन निर्णय घेण्यात येईल ,
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी मोफत पास मिळावा  व सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये चालावा याबाबत फेर टिप्पणी सादर करण्याचे आदेश कुसेकर यांनी मुख्य कामगार  अधिकाऱ्यांना दिल्याने वर्षभरासाठी पास मिळण्याचा मार्ग  मोकळा झाला आहे ..
मोफत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व रजेच्या रोखी करणाचे  पैसै एक रकमी देण्यात यावेत.सदर पैसे अजुनही दिलेले नाहीत हा भार अंदाजे ३०० कोटी रुपयांचा आहे या बाबत तातडीने अहवाल  मागवून निर्णय घेतला जाईल …नियमित कर्मचाऱ्यांना नुकतीच २०२० पासुन नवीन वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे .. त्यादरम्यान निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढलेल्या वेतनश्रेणी,महागाई भत्ता,घरभाडे जी काही फरकाची रक्कम होईल ती एक रकमी मिळावी या बाबत महामंडळ सकारात्मक आहे …..
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून स़ंघटनेने  २०२२ पासुन अनेक माध्यमांतून प्रयत्न केलेले आहेत .
परंतु फारसं यश न आल्याने या सर्व जेष्ठ कर्मचाऱ्यांनी  आंदोलन करण्याचे ठरवले होते
महामंडळाने  संघटनेच्या प्रतिनिधींशी आशादायी चर्चा केल्यामुळे   ७ आँक्टोबर ला राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे होणारे आत्मक्लेश आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे  सरचिटणीस सदानंद विचारे यांनी सांगितले आहे …

रत्नपाल जाधव प्रसिद्धी सचिव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here