सर्व प्रश्नांची जाण असणारा उमेदवार आपण निवडून द्या
शिवस्वराज्य यात्रे’ला जनतेचा मोठा प्रतिसाद
दिंडोरी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शिवस्वराज्य यात्रे’ दरम्यान दिंडोरी, नाशिक येथे भव्य सभा संपन्न झाली. दलित, आदिवासी व अल्पसंख्यांक समाजाने लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नाकारल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी म्हटले. तसेच ठराविक लोकांना निधी देऊन मतं खरेदी करण्याचे पाप महायुती सरकार करत असल्याचा हल्लाबोल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर केला.
जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील त्रिकुट सरकारच्या कार्यकाळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिकांना रोजगार नाही, पिण्याच्या पाण्याच्या योजना अपूर्ण राहिल्या आहेत, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, दूध उत्पादकता घटली आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, इतर कर्मचारी आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांची जाण असणारा उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे. असे जयंत पाटील म्हणाले.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी जलसंपदा मंत्री असताना येथील वळण बंदरांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली होती. आपले महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पाणी व्यवस्थापन आणि इतर सर्व प्रश्नांना सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. असेही जयंत पाटील यांनी सागितले.
जयंत पाटील म्हणाले की, एक सालस, संयमी, निष्ठावंत भगरे सरांना तुम्ही लोकसभेत निवडून दिले. आता विधानसभेसाठी देखील आपण असाच उमेदवार शोधून त्यास बहुमताने निवडून द्यायचे आहे. असे जयंत पाटील यांनी बोलताना म्हटले आहे.
याप्रसंगी पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, खासदार भास्कर भगरे, आमदार सुनील भुसारा, श्रीराम शेटे, महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. रोहिणीताई खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख पंडीत कांबळे, कोंडाजी आव्हाड, जयवंत वानोळे, नानासाहेब महाले, दत्तात्रय पाटील, गजानन शेलार, संगीता पाटील, गोकुळ पिंगळे, पुरुषोत्तम कडलग, सचिन पिंगळे, तिलोत्तमा पाटील, तुषार जाधव, श्याम हिरे, सुनीता थारोस्कर, शालीग्राम माळकर, संतोष अहिरे व मनोज खांदपे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्राला राज्यात मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. उद्या २५ सप्टेंबर रोजी शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यातील देवळाली आणि सिन्नर या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.

















