Home पुणे कुटुंंबाअंतर्गत होणाऱ्या मुलींच्याशोषणाविरुद्ध कुटुंब व सामाजिक स्तरावर जागृती होणे गरजेचे – डॉ.नीलम...

कुटुंंबाअंतर्गत होणाऱ्या मुलींच्याशोषणाविरुद्ध कुटुंब व सामाजिक स्तरावर जागृती होणे गरजेचे – डॉ.नीलम गोऱ्हे,उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य

144
0

पुणे 

बदलापूर येथे एका शाळेत घडलेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शासनाने शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयास उपायोजनासाठी महाराष्ट्रातील विविध शाळांना निर्देश दिले .

त्यातील एक भाग म्हणून शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले.
*या संदर्भात शाळा व्यवस्थापनावर जबाबदारी निश्चित करण्यात आली.* बऱ्याचदा मुलींना लैंगिक अत्याचाराच्या घटनेची कुठेही वाच्यता करावयाची नाही अशी धमकी गुन्हेगारांकडून दिली जाते, अशा वेळेस शालेय स्तरावरील तक्रार पेटी , समुपदेशन या माध्यमातून आता अनेक घटना उघडतीस येताना दिसून येत आहेत .
पुण्यात शाळकरी मुलीला गुंगीचे इंजेक्शन देऊन तिच्यावर जवळच्या नातेवाईकानी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली .
शाळेतील तक्रार पेटीत मुलीने ती घटना एका अर्जात लिहिल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. आरोपींनी कोणाला काही सांगितले तर त्या संदर्भातील फोटो सर्वत्र पसरवून बदनामी करीन , अशी धमकी दिली.
कुटुंबातील व्यक्तीनेच मुलीचे शोषण केल्यास मुलींच्या पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहतो.
कुटुंब व समाज स्तरावर जागृती होऊन संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे आहे .
शालेय स्तरावरील मुलींच्या सुरक्षेसाठी अजून काही योजना करता येतील का; यावर शासनाच्या शालेय विभाग, गृह विभाग सामाजिक न्याय विभाग यांच्याशी चर्चा करणार असल्याचे” डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here