Home मुंबई बोरिवलीच्या मिनी नाट्यगृहाला नाटककार जयवंत दळवी यांचे नाव देण्याच्या कोमसाप च्या प्रस्तावाला...

बोरिवलीच्या मिनी नाट्यगृहाला नाटककार जयवंत दळवी यांचे नाव देण्याच्या कोमसाप च्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता

834
0

दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा व बोरिवली शाखेच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने बोरीवली येथे त्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात बोरिवलीच्या मिनी नाट्यगृहाला नाटककार जयवंत दळवी यांचे नाव देण्याच्या यापूर्वीच केलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचा विचार बोरिवली शाखेच्या माजी अध्यक्षा  अनुराधा नेरूरकर यांनी व्यक्त केला.
त्याला तत्काळ प्रतिसाद देऊन केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.प्रदीप ढवळ यांनी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन,नवा प्रस्ताव स्वतः सादर केला आणि त्या प्रस्तावाला  मुख्यमंत्री यांची तत्त्वतः मान्यता देखील मिळवून घेतली.
त्यांच्या या तत्परतेमुळे, प्रयत्नाने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या या महत्वाच्या कार्याला आणि जयवंत दळवी यांच्या साहित्यिक योगदानाला मिळालेली एक मानवंदना  असल्याची  कोमसाप चे मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोज सूर्यकांत वराडे यांनी भावना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here