Home राजकीय गंगापूर,वैजापूर आणि कन्नड येथे आदित्य ठाकरे यांची ‘ महाराष्ट्र स्वाभिमान सभा’

गंगापूर,वैजापूर आणि कन्नड येथे आदित्य ठाकरे यांची ‘ महाराष्ट्र स्वाभिमान सभा’

180
0

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मशाल पेटवायची आहे -आदित्य ठाकरे

आम्ही सज्ज झालोय भगव्याचा स्वाभिमान जपण्यासाठी ! महाराष्ट्रद्वेष्ट्यांना आता महाराष्ट्रात थारा नाही – आदित्य ठाकरे

पैठण 

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्यजी ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पैठण आणि वैजापूर येथे महाराष्ट्र स्वाभिमान येथे पार पडली . पैठण येथील माहेश्वरी भक्त निवास सभागृहात पार पडलेल्या, महाराष्ट्र स्वाभिमान सभेत उपस्थित शिवसैनिकांनी आणि पैठणवासियांनी ऊर्जा दिली, महाराष्ट्रात ‘बदल’ घडवण्यासाठी, आपला स्वाभिमान जपण्यासाठी . तसचं महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून आम्हाला खूप प्रेम मिळत आहे . ह्या प्रेमापोटीच आम्ही लढतोय ! महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून आज एल्गार केलाय . महाराष्ट्राच्या भल्यासाठी आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पेटून उठलेली स्वाभिमानी जनता आमच्यासोबत आहे . महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही ही लढाई आता होऊन जाऊदेच! असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला .

राज्यात मशाल आगामी विधानसभा निवडणुकीत पेटवायची आहे – आदित्य ठाकरे

कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘पुढील ५० वर्ष ठरवरणी ही निवडणुक आहे . महायुतीवाले शिवसेना व जनतेला घाबरले आहेत . महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही . आणि या पैठणला मद्यपान केलेल्या लोकप्रतिनिधीवरील राग मतदानातून प्रकट करा . महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात बिकट निवडणुक आगामी विधानसभा आहे . राज्यात मशाल आगामी विधानसभा निवडणुकीत पेटवायची आहे . असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी.पैठणच्या सभेतून व्यक्त केला .

देशात आणि राज्यात शेतकरी विरोधी सरकार

आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना म्हटलं देशात कांद्याची निर्यात बंदी विरोधात 2 शिवसेनेने आवाज उठविला होता . केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याची त्यांनी मागणी केली होती . पण त्यांनी तसं केलं नाही . भाजपाला जनतेनी त्याची जागा दाखवली आहे . शेत नुकसान भरपाईचे पंचनामे करुन सुध्दा राज्य सरकारने नुकसान भरपाई दिली नाही .उद्धव साहेब यांनी घोषित केलेल्या प्रमाणे कर्जमुक्ती केली होती . पण यांच्या कृषी कृषिमंत्र्यांना महाराष्ट्रतील जनतेने एकदाही बघितले नाही . असं आदित्य ठाकरे म्हणाले .

येणारी निवडणूक आपल्या स्वाभिमानासाठी

शेतकऱ्यांवर मागिल दोन वर्षात मोठे संकट आले तरीही मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही . सतत्त्याने आम्ही शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेलो असतो . पिक वीमा, अनुदान आमच्या सरकारच्या काळात मिळवून दिले . भाजपाला कांदा निर्यात बंदीचा मतदान मध्ये नुकसान होत असल्याने बंदी उठवली गेली . भाजपचा एकही आमदार उद्योग आणल्याचे बोलत नाही . भाजप महाराष्ट्र द्वेशी आहे, महायुतीचे एकही आमदार तरुणांना रोजगार मिळवून दिला असे म्हणु शकत नाही . पुण्यात तीन दिवस स्पर्धा परीक्षाचे अभ्यास करणारे विद्यार्थी आंदोलन करत होते, पण लक्ष दिलं नाही . त्यामुळे येणारी निवडणूक आपल्या स्वाभिमानासाठी आहे . असं आदित्य ठाकरे म्हणाले .

अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराचे प्रमाण या शासनाच्या कार्यकाळात वाढले

आगामी विधानसभा निवडणुकीत मिंधे सरकारचे शासन येत नाही . बदलापूर घटनेत आंदोलन करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले . अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराचे प्रमाण या शासनाच्या कार्यकाळात अधिक वाढले आहेत . अनेक महिलांवर अत्याचार करणारे रेवन्ना यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी प्रचार केला . बिल्कीस बानो या मुस्लिम महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी न्याय मिळाला नाही . इथे उध्दव साहेबांनी आपल्या मंत्रीमंडळ मधून काढून टाकलेल्या मंत्र्याला मिंधेनी मंत्री पद दिलय . असं म्हणत सरकारवर आदित्य ठाकरेंनी टीका केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here