*”तू अशा बातम्या देत आहेस,जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे,”*
*बदलापूर माजी नगराध्यक्षवामन म्हात्रे ची हिडीस भाषा.*
*महिला पत्रकाराचा अपमान व लज्जित करणारे !*
वामन म्हात्रे नावाचा बदलापूरचा माजी नगराध्यक्ष ज्या पध्दतीने हिडिस वक्तव्य बदलापूर येथील अत्याचाराचे वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराशी निर्लज्जपणाचा कळस गाठत बोलतो.
ते पहाता ही वक्तव्य करण्याची कोणती संस्कृती वाढतेय याचा विचार सर्वच राजकीय पक्षांनी करायला हवा!
“तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे,”
वामन म्हात्रे या व्यक्तिच्या हिडिस वक्तव्याचा ;
मिडिया असोसिएशन ऑफ इंडियाने तीव्र शब्दात निषेध केला आहे
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत साडेतीन चार वर्षांच्या दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला.
आज सकाळपासून बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक व नागरिकांनी आंदोलन सुरू केले . यापैका काहीनी सकाळी साडे दहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकाकडे मोर्चा वळवला.
त्यामुळे मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद झाली.
या घटनेचा सर्व पातळीवर निषेध व्यक्त होतोय.
सकाळच्या महिला पत्रकाराने बालिका अत्याचाराचा विषय आपल्या माध्यमातून चार दिवसापासून लावून धरला होता.
त्याने बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचे सर्वच नियंत्रण सुटले , महिला पत्रकाराला अडवून ,’तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, ‘…
काय ही भाषा काय हा नेता? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेऊन वामन म्हात्रे याच्यावर कारवाई करावी .अन्यथा आम्हा फक्त १०महिला पत्रकारांच्या ताब्यात द्यावे,म्हणजे कशी भाषा वापरू नये याचा धडा त्याला देता येईल! अशी मागणी माईच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे.




















