Home मुंबई बदलापूर घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

बदलापूर घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

129
0

मुंबई 

एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेचा उदोउदो करत असताना
विद्यार्थ्यांचे संरक्षण सरकार करू शकत नाही. एकप्रकारे सरकारची शो बाजी सुरू आहे.
उरण, बेलापूर, मीरा भाईंदरसारख्या घटना ताज्या असताना शाळेत अशी घटना घडणे हे
निषेधार्ह आहे. या गुन्हेगारांना
आंध्रप्रदेश राज्यात ज्याप्रमाणे शिक्षा दिली तशी
गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

येणाऱ्या काळात अशा गुन्ह्यांना विरोधात जन आक्रोश होईल. या अत्याचाराला बळी पडलेल्या भगिनी हिंदू नाही का असा सवाल करत या घटनेचा दानवे यांनी तीव्र निषेध नोंदवला.

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशात घोटाळा
१५ ऑगस्ट पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणवेष वाटप होईल असे शिक्षणमंत्री यांनी सभागृहात दिलेले आश्वासन हवेतच विरले. स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना जुने गणवेष घालून ध्वजारोहण करावे लागले.

७.५ लाख विद्यार्थ्यांना फक्त गणवेश वाटप झाले असून अजूनही ३७ लाख गणवेशापासून वंचित आहेत. गणवेशात कॉटनचे प्रमाण आवश्यक असताना
पॉलिस्टर कापडाचा वापर त्यात करण्यात आला आहे. तर शर्टाच्या बाह्यांसाठीही वेगळे कापड वापरण्यात आल्याचे दानवे यांनी थेट गणवेष दाखवून यातील घोटाळा उघडकीस केला. त्यामुळे संबंधित अधिकारी व पुरवठादार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी लावून धरली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर सार्वजनिक बांधकाम मंत्री फक्त चार खड्डयांची पाहणी करतात. रामदास कदम यांनी केलेला आरोप योग्य असल्याचं म्हणत त्यांचा विभाग हा टेंडरमध्ये व बदल्या करण्यात गुंतले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

मराठवाडयातील धार्मिक श्रद्धा जोडलेल्या देवस्थानाच्या जमिनी खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्याचा पूर्णविचार करावा. याविरोधात मराठवाडा आंदोलन सुरू होत असल्याचे दानवे म्हणाले.

पूनम पवार या विद्यार्थिनीने फी भरू न शकल्यामुळे आत्महत्या केली त्यानंतर सरकारने मोफत शिक्षणाची घोषणा केली मात्र तिच्या कुटुंबाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप दानवे यांनी केला.

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात साखरेचे प्रमाण निश्चित केले. हा निर्णय शुगर कारखानदारांच्या दबावाखाली घेतला गेलाय.
आंधळं दळतय कुत्रं पीठ खातय, अशी सरकारची अवस्था असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here