चाकणच्या चक्रेश्वर देवस्थानचा कायापालट! अजितदादांनी दिलेल्या ५.८० कोटींच्या निधीतून विकासकामांचे लोकार्पण — सुनेत्रा पवार*
*पुणे/चाकण (MyMedia24) -* चाकण येथील प्रसिद्ध चक्रेश्वर मंदिरात आज उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री *सुनेत्रा अजितदादा पवार* यांच्या हस्ते चक्रेश्वर देवस्थानच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
*किती निधी? कोणता निधी?*
आदरणीय अजितदादांनी चक्रेश्वर देवस्थानच्या विकासासाठी *५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी* उपलब्ध करून दिला होता. या निधीतून साकारलेल्या विविध विकासकामांचे आज लोकार्पण झाले. मंदिर परिसरातील अनेक रस्त्यांचेही सुंदर पद्धतीने काम झाले आहे.
*सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?*
अनेक वर्षांपासून चाकणकरांची या देवस्थानच्या विकासाची मागणी होती, ती अजितदादांनी पूर्ण केली. अजितदादांच्या पश्चात त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी केलेल्या विकासकामांतून साकारलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळत आहे. कुठेही गेलं तरी ज्या ठिकाणी विकासकामांची गरज होती, तिथे दादांनी निधी दिला. राज्यातील अनेक मंदिरांच्या विकासातही त्यांचे मोलाचे योगदान आहे.
दादांनी दिलेला विकासाचा वारसा आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठीच मी आज आपल्यासमोर उभी आहे. मी नेहमीच आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन, अजितदादांप्रमाणेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी मी सदैव कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
—
*



















