BMC मुख्यालयात दिवाळी बाजार! महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, आयुक्तांनी केली खरेदी*
*मुंबई (MyMedia24) -* दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या विविध वस्तूंचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले.
*कुठे भरलं प्रदर्शन?*
BMC मुख्यालयाच्या जुन्या इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सोबतच महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्येही दिवाळीनिमित्त प्रदर्शन-विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते.
*कोणी भेट दिली? कोणी खरेदी केली?*
– *महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा — मीनल तुर्डे*
– *महानगरपालिका आयुक्त — अश्विनी भिडे*
– *अतिरिक्त आयुक्त (शहर) — प्राजक्ता वर्मा-लवंगारे*
– *अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) — डॉ. विपिन शर्मा*
– *संचालक (नियोजन) — डॉ. प्राची जांभेकर*
या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः प्रदर्शनाला भेट देऊन वस्तूंची खरेदी केली. BMC मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
*काय होतं प्रदर्शनात?*
नियोजन विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना–राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हे प्रदर्शन आयोजित केले होते. उद्देश — महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
*विक्रीला काय होतं?*
उटणे, अगरबत्ती, ज्यूट बॅग्ज, इमिटेशन ज्वेलरी, मोत्यांचे दागिने, रांगोळी, सुवासिक द्रव्ये, सुशोभित पणत्या, आकर्षक तोरणे, आकाशकंदील आणि विविध खाद्यपदार्थ.
*विशेष आकर्षण —*
BMC च्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या सुंदर आणि नाविन्यपूर्ण वस्तूही मांडण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना समावून घेण्यात आले.
—





















