Home मुंबई मुंबईकरांसाठी दिवाळी भेट! राणीच्या बागेत अखेर येणार आशियाई सिंह — गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी...

मुंबईकरांसाठी दिवाळी भेट! राणीच्या बागेत अखेर येणार आशियाई सिंह — गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दिले ग्रीन सिग्नल!*

8
0

मुंबईकरांसाठी दिवाळी भेट! राणीच्या बागेत अखेर येणार आशियाई सिंह — गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दिले ग्रीन सिग्नल!*

*मुंबई (MyMedia24) -* मुंबईकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार! भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) लवकरच आशियाई सिंहाची डरकाळी ऐकायला मिळणार आहे.

*काय घडलं आज गांधीनगरमध्ये?*
मुंबईच्या महापौर * रितू राजेश तावडे* यांनी आज ४ नोव्हेंबर रोजी गुजरातचे मुख्यमंत्री * भूपेंद्रभाई पटेल* यांची गांधीनगर येथील मुख्यमंत्री निवास येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ही भेट अतिशय फलदायी ठरली.

*मुख्यमंत्र्यांचे थेट निर्देश!*
गुजरातचे मुख्यमंत्री पटेल यांनी तात्काळ गुजरात प्रशासनाला निर्देश दिले आहेत की, जुनागढचे *साकरबाग प्राणिसंग्रहालय आणि मुंबई प्राणिसंग्रहालय* यांच्यादरम्यान लवकरात लवकर सामंजस्य करार (MoU) करावा. लवकरच BMC ला लेखी मंजुरी पत्र आणि कराराचा मसुदा मिळणार आहे.

*कोण होतं उपस्थित?*
या ऐतिहासिक भेटीवेळी आमदार प्रकाशभाई वरमोरा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव संजीव कुमार, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शाह, BMC संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी उपस्थित होते.

याचबरोबर महापौर तावडे यांनी गुजरातचे वन राज्यमंत्री प्रवीणकुमार माळी यांचीही भेट घेऊन वन विभागाला निर्देश देण्याची विनंती केली, त्यावर मंत्र्यांनी तत्काळ शेरा मारून कार्यवाहीचे आदेश दिले.

*काय आहे डील?*
– *गुजरात देणार:* 2 जोड्या (2 नर + 2 मादी) आशियाई सिंह
– *मुंबई देणार:* 3 जोड्या टफ्टेड कॅपुचिन माकडे

दोन्ही प्राणिसंग्रहालयांनी याला आधीच संमती दिली असून, CZA (केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण) च्या मान्यतेनुसार राणीच्या बागेत सिंहांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक निवासस्थान सज्ज आहे.

*महापौर रितू तावडे यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र-गुजरात वन्यजीव संवर्धन सहकार्याला नवी दिशा मिळाली असून, मुंबईकरांना ही खरी दिवाळी भेट ठरली आहे.*

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here