Home मुंबई *आरती आर्ट अकॅडमी बोरिवलीत साजरा करणार मराठी रंगभूमी दिवस!*

*आरती आर्ट अकॅडमी बोरिवलीत साजरा करणार मराठी रंगभूमी दिवस!*

9
0

**आरती आर्ट अकॅडमी बोरिवलीत साजरा करणार मराठी रंगभूमी दिवस!** मुंबई उपनगरातले साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या आरती आर्ट अकादमीच्या वतीने येत्या ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिवसानिमित्त प्रबोधनकार ठाकरे येथे जयवंत दळवी लघु नाट्यगृहात रात्रौ ८वाजता “वशा हृदयी फुलला!” या विनोदी एकांकिकेचा तसंच माध्यम कलामंच निर्मित,प्रवीण धोपट लिखित आणि डॉक्टर अनिल बांदिवडेकर दिग्दर्शित “खो” या दीर्घांकाचा प्रयोग संपन्न होणार आहे. “वश्या हृदयी फुलला!” या हास्य एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शन आकाश आनंद यांचे आहे. संगीत राजेश प्रसाद,प्रकाश योजना रवींद्र जंगम यांची आहे. संजय देशपांडे,रेश्मा मर्चंट, केतकी दिघे,संदीप कबरे, आनंद सामंत, प्रथमेश गडकर, सुवर्णा संदिमनी, सिद्धी कामथ तसेच जानवी दरेकर हे कलाकार सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य /स्वच्छामूल्य आहे. कार्यक्रमासाठी नोंदणी आवश्यक आहे, असे आरती आर्ट अकॅडमीच्या सूत्राकडून समजते. नोंदणीसाठी संपर्क: ९९६९१६५१०१ आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here