*दादासाहेबांमागील सावली – सरस्वतीबाई फाळकेंची विलक्षण कहाणी आता रंगमंचावर! ‘मिसेस संकलक’ नाटकाचे पुणे व मुंबईत प्रयोग*
*पुणे/मुंबई – प्रतिनिधी
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नाव प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. पण त्यांच्या या महान प्रवासात त्यांच्या खांद्याला खांदा लावून, संसाराचा गाडा ओढत चित्रपटसृष्टीचा पाया रचणाऱ्या *सरस्वतीबाई फाळके* यांचे योगदान इतिहासाच्या पडद्याआडच राहिले.
चूल, मूल आणि संसार सांभाळत चित्रपटाच्या रिळांचे संकलन करणाऱ्या भारताच्या *पहिल्या महिला चित्रपट संकलक* सरस्वतीबाई फाळके यांची ही प्रेरणादायी आणि दुर्लक्षित गोष्ट आता रंगमंचावर येत आहे.
*Being Kalakar* या संस्थेने *’मिसेस संकलक : मुक्काम पोस्ट चित्तरवाडी’* हा आगळावेगळा नाट्यप्रयोग घेऊन आले आहेत.
या नाटकातून सरस्वतीबाईंचा संघर्ष, त्याग आणि चित्रपटांवरील निस्सीम प्रेम उलगडणार आहे. ज्या स्त्रीने भारतीय चित्रपटांना खऱ्या अर्थाने आकार दिला, तिची गोष्ट प्रत्येकाने पाहायलाच हवी.
*प्रयोग कुठे आणि केव्हा?*
*१. पुणे :*
रविवार, १५ नोव्हेंबर २०२६, सायं. ७:३० वा.
स्थळ : द बॉक्स (The Box), पुणे
तिकीट : https://in.bookmyshow.com/plays/mrs-sankalak-mukkam-post-chittarwadi/ET00521771
*२. मुंबई :*
शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६, रात्री ८:०० वा.
स्थळ : श्री शिवाजी मंदिर, दादर
तिकीट : https://in.bookmyshow.com/plays/mrs-sankalak-mukkam-post-chittarwadi/et167o67y0
दोन्ही प्रयोगांची तिकिटे *BookMyShow* वर उपलब्ध आहेत.
कला आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक रसिकाने या नाटकाला आवर्जून उपस्थिती लावावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
*संपादक: प्रा. शीतल हरीश करदेकर*
*MAI MEDIA 24 | आपल्या हक्काचे गल्ली ते दिल्ली व्यासपीठ*
—

























