Home उद्योग / शिक्षण वार्ता १६० कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा – नाशिक जिल्ह्यात SIT ची धडक कारवाई*...

१६० कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा – नाशिक जिल्ह्यात SIT ची धडक कारवाई* * आज २६ ऑक्टोबरला सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या वैयक्तिक मान्यता फाईल्सची तपासणी*

23
0

*🔴 १६० कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा – नाशिक जिल्ह्यात SIT ची धडक कारवाई*
*२६ ऑक्टोबरला सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या वैयक्तिक मान्यता फाईल्सची तपासणी*

*नाशिक, (MAI MEDIA 24) -*

राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे धागेदोरे आता नाशिक जिल्ह्यात पोहोचले आहेत. जिल्हा परिषदेचे प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नरेश पाटील यांनी काढलेल्या परिपत्रकाने (क्र. ३०७/२०२६) जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमध्ये खळबळ उडाली .

*काय आहे प्रकरण?*

शालार्थ ही शासनाची पगार प्रणाली आहे. या प्रणालीत बनावट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या घुसवून कोट्यवधी रुपयांचे वेतन व थकबाकी लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राज्य शासनाने ७ ऑगस्ट २०२५ रोजी SIT स्थापन केली आहे, आता CID च्या देखरेखीखाली १२ पथके तपास करत आहेत.

नाशिक गुन्हे शाखेने आतापर्यंत:
– २२९ शाळांचे रेकॉर्ड जप्त
– १७९ मुख्याध्यापकांची चौकशी
– ५५ जणांना अटक, ६१० शिक्षक-कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात

*नवीन आदेश काय?*

विशेष चौकशी पथकाच्या (SIT) सूचनेनुसार आता प्रत्येक शाळेची *वैयक्तिक मान्यता नस्ती (स्थळ प्रत)* तपासली जाणार आहे.

> *”सोबतच्या यादीतील सर्व शाळांनी आपल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तत्कालीन वैयक्तिक मान्यतेची संपूर्ण फाईल ओरिजनल कागदपत्रांसह घेऊन हजर रहावे. एकाच संस्थेच्या अनेक शाळा असतील तर एकाच प्रतिनिधीने सर्व फाईल्स घेऊन यावे.”* असे निर्देश काढले गेले

*📅 हजर राहण्याची वेळ:* २६ ऑक्टोबर २०२६, सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत
*📍 ठिकाण:* शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालय, जिल्हा परिषद, त्र्यंबक नाका, नाशिक

*पुढे काय होणार?*
ज्या शाळांच्या फाईल्समध्ये बनावट नियुक्ती, बॅकडेटेड एंट्री, बनावट शालार्थ ID आढळतील, त्यांच्यावर FIR आणि वेतन वसुलीची कारवाई होण्याची शक्यता आहे.

*MAI MEDIA 24 चा सवाल: नाशिक जिल्ह्यातील किती शाळा या घोटाळ्यात अडकणार?*

—
*वृत्त : जे सत्य सांगते; सद रक्षणाय, खल दमनाय*
*MAI MEDIA 24 | नाशिक*
*#ShalarthGhotala #NashikSIT #160CroreScam #ZPNashik #MAIMEDIA24 #Breaking*

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here